सातारा जिल्ह्यात 469 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित; 4 बाधितांचा मृत्यू
सातारा दि.30(जिमाका): जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 469 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 4 बाधितांचा मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे. आजअखेर एकूण 239092 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित झाले असून एकूण 6012 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.
तसेच जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 633 जणांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
एकूण बाधित –239092
घरी सोडण्यात आलेले 226907
मृत्यू -6012
उपचारार्थ रुग्ण- 9529
No comments