शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी महाविद्यालयांना आता 31 ऑगस्टपर्यत मुदतवाढ
सातारा दि.10 (जिमाका): सामाजिक न्याय विभागांतर्गत अनुसूचित जाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यासाठी महाडिबीटी ऑनलाईन प्रणालीवर शिष्यवृत्ती, शिक्षण फी व इतर योजनांचे अर्ज भरण्यात येतात. सर्व महाविद्यालयांना 2020-21 शैक्षणिक वर्षातील आपल्या विद्यार्थ्यांचा अर्ज भरण्यासाठी आता 31 ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सातारा समाजकल्याण कार्यालयाचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी दिली.

No comments