Breaking News

चायनीज मांजा विक्री ; दोघांवर गुन्हा

Chinese manja sales; Crime on both

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा ) दि. १३ ऑगस्ट - फलटण शहरात चायनीज मांजा विकत असणाऱ्या दोन जणांवर फलटण शहर पोलिसांनी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.

     फलटण शहर पोलीस स्टेशन कडून  मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 12 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी फलटण येथे यश ट्रेडर्स नावाच्या दुकानात इसम नामे विशाल शरद दोशी राहणार रिंग रोड फलटण हे चायनीज मांजा विक्री करीत असताना मिळून आले आहेत. त्यांचेकडून एकूण 450 रुपये किंमतीचा प्रतिबंधित घातक मांजा जप्त करण्यात आला आहे.

    तसेच  शुक्रवार पेठ फलटण येथे चंद्रकांत ज्वेलर्स नावाच्या दुकानात इसम नामे आकाश चंद्रकांत पालकर वय 23 वर्ष राहणार शुक्रवार पेठ फलटण हे त्यांच्या दुकानात 850/- रुपये किंमतीचा प्रतिबंधित असलेला घातक चायनीज मांजा विक्री करीत असताना मिळून आला आहे. त्यांच्यावर भा द वि स 188 व 270 या कलमान्वये कारवाई करण्यात आलेली आहे.

    तसेच यापूर्वी फलटण शहरात तीन दुकानदार चायनीज मांजा विक्री करीत असताना मिळून आल्याने त्यांच्यावर ही प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

    सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री भारत किंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्री नवनाथ गायकवाड, सहाय्यक पोलीस फौजदार श्री शिंदे , पोलीस हवलदार धापते पोलीस नाईक लोंढे, पोलीस कॉन्स्टेबल जगताप पोलीस कॉन्स्टेबल लोलापोड, पोलीस कॉन्स्टेबल दडस यांनी केली आहे.

No comments