Breaking News

चायनीज मांजा ; 5 जणांवर गुन्हा ; 46 हजाराचा माल जप्त

Chinese Manja; Crime against 5 people; Goods worth Rs 46,000 seized

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा ) दि. १४ ऑगस्ट - फलटण शहरात काल नागपंचमी दिवशी चायनीज सिंथेटिक मांजा  बाळगणाऱ्या  पाच जणांवर फलटण शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून, त्यांच्याकडून एकूण 46 हजार 160 रुपयांचा चायनीज सिंथेटिक मांजा जप्त केला  आहे.

    फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 13/8/2021 रोजी सकाळी 10.15 वाजता सुमारास स्वामी समर्थ मंदिर फलटण येथे संदीप प्रकाश गेजगे रा. गणेश नगर बारामती रोड फलटण यांनी, पक्षी, जनावरे, मनुष्य यांना दुखापत होईल असा 850/- रुपये किमतीचा चायनीज सिंथेटिक मांजा बाळगला असल्याचे मिळून आला.

    तसेच सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास मिरज अग्रवाल रा. सगुनामाता नगर मलटण, फलटण याने घरात 44400/- रुपये किंमतीचा पशुपक्षी, जनावरे, मनुष्य यांना इजा दुखापत होईल असा प्लास्टिक चायनीज सिंथेटिक मांजा बाळगला असल्याचे मिळून आला.

     दिनांक 13 /8/2021 रोजी सकाळी 10.15 वाजताच्या सुमारास, धनराज दीपक कर्वे रा. फलटण, आयाजखान पठाण रा. पाचबत्ती चौक फलटण, अक्षय हनुमंत लकडे रा. निरगुडी ता. फलटण हे पशु पक्षी जनावरे मनुष्य यांना दुखापत होईल असा 910/- रुपये किंमतीचा प्लास्टिक चायनीज सिंथेटिक मांजा बाळगला असल्याचे मिळून आले आहेत. वरील सर्वांवर  भारतीय दंड संहिता कायदा कलम 188, 336 तसेच पर्यावरण संरक्षण कायदा कलम 5 व 15 या कलमान्वये वेगवेगळे तीन गुन्हे दाखल केले आहेत. अशाच प्रकारचे आणखी दोन गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

    सदरची कारवाई श्री तानाजी बर्डे उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण,  श्री भारत किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि श्री सचिन राऊळ, पोऊनी अमोल कदम, पो हवा दिलीप येळे, पो हवा राहुल भोईर, पो हवा रत्न सिंह सोनवलकर, पो. कॉ. विक्रम बनकर, पो हवा धापाते, पो ना विक्रांत लावंड, पोलीस हवा. विजय खाडे, यांनी केलेली आहे.  

No comments