चिंता वाढली ! फलटण तालुक्यात 167 कोरोना बाधित ; सर्वाधिक गुणवरे 19, मठाचीवाडी 9
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 13 ऑगस्ट 2021 - काल दि. 12 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 167 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 16 रुग्ण तर ग्रामीण भागात 151 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक गुणवरे येथे 19 रुग्ण तर त्या खालोखाल मठाचीवाडी येथे 9 रुग्ण सापडले आहेत. कोरोना बधितांच्या संख्येने आज पुन्हा दिडशे संख्या पार करत 167 आकडा गाठला आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढत असून, यामुळे चिंता वाढली आहे.
काल दि. 12 ऑगस्ट 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 167 बाधित आहेत. 167 बाधित चाचण्यांमध्ये 83 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 84 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 16 तर ग्रामीण भागात 151 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात गुणवरे 19, मठाचीवाडी 9, बरड 8, काळज 4, कोळकी 4, मुरूम 7, मिरढे 1, पिंपरद 1, शिंदे माळ 2, जिंती 1 , निंभोरे 4, गिरवी 2, शेरेशिंदेवाडी 1, सरडे 1, साखरवाडी 3, साठे 3 , सोमंथळी 3, खराडेवाडी 2, खुंटे 2, ठाकुरकी 1 , दालवडी 1, वाखरी 2, वडले 2, चौधरवाडी 3, तरडगाव 2, तावडी 4, तडवळे 3, जाधव वाडी 5, जावली 1, टाकू बाई ची वाडी 2, आरडगाव 1, आसू 2, बिजवडी तालुका माण 1, धुळदेव 2, घाडगेवाडी 3, खटकेवस्ती 4, झडकबाईचीवाडी 3, बोडकेवाडी 1, कांबळेश्वर 3, मांडवखडक 1, मुंजवडी 1, मलवडी 1, मिरेवाडी 1, विडणी 3, निरगुडी 1, फरांडवादी 2, रावडी खुर्द 2, राजाळे 1, राजुरी 1, सांगवी 3, सावंत वाडा 4, सोनगाव 1, उपळवे 2, दुधेबावी 1, बुध तालुका खटाव 1, वारुगड तालुका माण 1, धर्मपुरी तालुका माळशिरस 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments