Breaking News

श्रावण मासात विविध देवदेवतांची मंदिरे प्रसंगी काही अटी घालुन उघडण्यास परवानगी द्या : मागणी

फलटण येथील माणकेश्वर मंदिर

Allow the opening of temples of various deities in the month of Shravan with certain conditions: Demand

    फलटण -: कोरोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर व्रतवैकल्याचा समजण्यात येत असलेल्या श्रावण महिन्यातही मंदिरे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने भक्त मंडळींमध्ये अस्वस्थता निर्माण होत असल्याचे सांगत काही निर्बंध जरुर घालावेत पण मंदिरे खुली करावीत अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
      फलटण ही महानुभाव आणि जैन धर्मियांची दक्षिण काशी समजली जाते आहे, त्याचबरोबर येथे हिंदू धर्मीयांसह विविध धर्म, जात, पंथांचे हजारो लोक वास्तव्यास असून येथे सर्व धर्मियांची असंख्य मंदिरे, प्रार्थना स्थळे व अन्य भक्तीची स्थाने मोठ्या संख्येने असल्याने या सर्वांची मागणी काही निर्बंध घालुन शासनाने मंदिरे, प्रार्थना स्थळे, अध्यात्म केंद्रे उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे.
    श्रावण महिन्यात विविध महादेव मंदिरांप्रमाणे अन्य देवलयातही भाविक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत, मात्र मंदिरे बंद असल्याने त्यांची निराशा होत आहे.
    येथील शुक्रवार पेठ परिसरात, बाणगंगा नदीकाठी असलेल्या शिव शंकर, मारुती, शनि, दत्त वगैरे विविध देवदेवतांची असंख्य मंदिरे आहेत, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही सर्व मंदिरे बंद असल्याने भाविकांची कुचंबना होत आहे.
      बाणगंगा नदी काठी बालाजी, महादेव, मारुती, दत्त, शनि अशी विविध देवदेवतांची पुरातन म्हणजे संस्थानकाळाच्या अगोदरपासूनची ही मंदिरे भाविकांची श्रद्धास्थाने आहेत. यापैकी माणकेश्वर मंदिर अत्यंत पुरातन असून त्याच्या वरच्या भागात दगडी लावण्यात आली असून त्यावर मोठ्या प्रमाणावर माती टाकून त्याचे छप्पर करण्यात आले होते, पुरातन असल्याने त्यावरील मातीतून पावसाचे पाणी मंदिराच्या मंडपात झिरपू लागल्याने त्याची दुरुस्ती करण्याच्या उद्देशाने तरुण वर्गाने पेठेतील ज्येष्ठांचा सल्ला घेऊन माती बाजूला केल्यानंतर त्याच्या दुरुस्तीसाठी अंदाजे ५/७ लाख रुपयांची गरज असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर या तरुणांनी देणगीदाराचा शोध सुरु केला आहे तथापी अनेकांनी त्याला विरोध करुन सदरची जबाबदारी राजघराण्यातील श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वर सोपवावी अशी सूचना केली आहे. आगामी सप्ताहात सर्वांनी एकत्र बसून एकविचाराने/ सर्व संमतीने योग्य निर्णय घेऊन तातडीने त्याप्रमाणे कार्यवाही करावी असा सूर लागला आहे.
     दरम्यान माणकेश्वर मंदिर परिसर, मंदिराचा मंडप व परिसरातील सर्व मंदिरांची स्वच्छता, रंगरंगोटी करण्यात आल्याने संपूर्ण परिसर अत्यंत शांत, विलोभणीय, हवेशीर असल्याने सदर मंदिर श्रावण महिन्यात काही अटी घालुन खुले ठेवण्यास व भजनादी कार्यक्रमांना परवानगी द्यावी अशी मागणी हिट आहे.

No comments