जिंती येथील शेतकरयांना कृषीदूताचे मार्गदर्शन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - महात्मा फुले कृषी विद्यापीठांतग॔त येणारया काॅलेज ऑफ अॅग्रीकल्चर भानसहिवरे येथील विद्यार्थी कृषीदूत अडागळे कुणाल सुरेश यांनी शेतकरयांना आधुनिक पद्धतीचा वापर करून उत्पादन कश्या प्रकारे वाढवावे याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी, शेतीमध्ये चांगले व निरोगी पीक कशा प्रकारे घेता येईल. याची सविस्तर माहिती आडागळे यांनी दिली. शेतकरयांच्या मनात असलेल्या विविध शंकांचे निराकरण करण्यात आले. शेती विषयक वेगवेगळ्या प्रकारचे मार्गदर्शन केले.
यावेळी जिंती परिसरातील गणेश चव्हाण, रमेश गायकवाड, शरद कदम, धरम शिंदे, विमल अडागळे, गौतम झेंडे, सुरज शिर्के, गौरव शिंदे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.
त्याचबरोबर ही माहिती शेतकरयांना खुप उपयुक्त ठरली. अशाप्रकारे माहितीपूर्ण कार्यक्रम भविष्यात राबविण्यात यावे अशी इच्छा उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
No comments