फलटण तालुक्यात 154 कोरोना बाधित ; सर्वाधिक शहरात 26
फलटण दि. 24 ऑगस्ट 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) - काल दि. 23 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 154 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 26 रुग्ण तर ग्रामीण भागात 128 रुग्ण सापडले आहेत. फलटण ग्रामीण भागात सर्वाधिक कोळकी येथे 8 तर त्या खालोखाल बरड येथे 7 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 23 ऑगस्ट 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 154 बाधित आहेत. 154 बाधित चाचण्यांमध्ये 49 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 105 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 26 तर ग्रामीण भागात 128 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात कोळकी 8, बरड 7, तावडी 6, वाखरी 6, माळेवाडी 5, गुणवरे 5, खामगाव 1, कांबळेश्वर 2, काळज 2, कुरवली बुद्रुक 2, मुंजवडी 2, हिंगणगाव 3, भिलकटी 1, जिंती 5, परहर 1, पवारवाडी 1, फरांदवाडी 2, फडतरवाडी 1, सांगवी 2, सासकल 1, चांभारवाडी 2, चौधरवाडी 3, तरडगाव 4, तडवळे 3, जाधवनगर 1, जावली 2, आरडगाव 2, आसू 1, मेखळी 1, धुमाळवाडी 1, धुळदेव 2, खुंटे 2, खटकेवस्ती 1, ढवळ 3, बोडकेवाडी 2, मलवडी 1, बीबी 3, विंचुर्णी 2, विडणी 4, निंभोरे 2, निरगुडी 1, राजाळे 1, राजुरी 3, गिरवी 2, सोमंथळी 1, सोनवडी खुर्द 2, सस्तेवाडी 1, सुरवडी 1, दऱ्याचीवाडी 3, वाठार निंबाळकर 1, तामखडा 1, अलगुडे वाडी 1, अकलूज 1, बारामती 1, शिरसने 1, थदाळे 1, निरा 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments