फलटण तालुक्यात 136 कोरोना बाधित ; सर्वाधिक गुणवरे 14, मुंजवडी 12
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 14 ऑगस्ट 2021 - काल दि. 13 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 136 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 14 रुग्ण तर ग्रामीण भागात 122 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक गुणवरे येथे 14 रुग्ण तर त्या खालोखाल मुंजवडी येथे 12 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 13 ऑगस्ट 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 136 बाधित आहेत. 136 बाधित चाचण्यांमध्ये 36 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 100 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 14 तर ग्रामीण भागात 122 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात गुणवरे 14, मुंजवडी 12, जावली 7, जाधववाडी 6, कुरवली बुद्रुक 5, तरडगाव 4, गिरवी 4, धुळदेव 1, खडकी 1, खुंटे 1, ठाकूरकी 1, बरड 5, कांबळेश्वर 1, कोळकी 1, मांडवखडक 2, मुरूम 1, मलवडी 3, झिरपवाडी 1, बिबी 1, पिंप्रद 3, शिंदेवाडी 2, शिंदे नगर 1, विंचूर्णी 1, विडणी 1, निंबळक 3, निंभोरे 2, फरांदवाडी 1, रावडी बु 1, राजाळे 2, शेरेशिंदेवाडी 2, साखरवाडी 1, सोमंथळी 2, सुरवडी 1, उपळवे 3, दहिवडी तालुका माण 6, दुधेबावी 1, वाठार निंबाळकर 1, वडले 2, चौधरवाडी 4, ताथवडा 1, गोंदवले बुद्रुक तालुका माण 2, लोणंद 1, मठाचीवाडी 1, परतवाडी तालुका माण 1, सरडे 1,सांगवी 1, नांदल 1, टाकूबाईचीवाडी 1, आसू 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments