फलटण तालुक्यात 122 कोरोना बाधित ; सर्वाधिक जाधववाडी 10
फलटण ( गंधवार्ता वृत्तसेवा ) दि. 11 ऑगस्ट 2021 - काल दि. 10 ऑगस्ट 2021 रोजी रात्री आलेल्या रिपोर्टनुसार फलटण तालुक्यात 122 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये फलटण शहरात 13 रुग्ण तर ग्रामीण भागात 109 रुग्ण सापडले आहेत. फलटण तालुक्यात सर्वाधिक जाधववाडी येथे 10 रुग्ण तर त्या खालोखाल गुणवरे येथे 9 रुग्ण सापडले आहेत.
काल दि. 10 ऑगस्ट 2021 रोजी रात्री मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 122 बाधित आहेत. 122 बाधित चाचण्यांमध्ये 57 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 65 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे. यामध्ये फलटण शहर 13 तर ग्रामीण भागात 109 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात जाधववाडी 10, गुणवरे 9, कोळकी 6, मुरूम 5, धुळदेव 3, खुंटे 1, ढवळेवाडी 1 , ठाकूरकी 5, कांबळेश्वर 3, शिंदे माळ 1, विडणी 6, निंबळक 3, निंभोरे 3, गिरवी 6, फरांदवाडी 3, साखरवाडी 3, सांगवी 2, सुरवडी 1, उपळवे 1, तरडगाव 5, तावडी 2, सस्तेवाडी 1, सरडे 1, वारुगड तालुका माण 4, मुरूम तालुका बारामती 1, खामगाव 2, बोडकेवाडी 1, कापशी 1, कोरेगाव 1, कुरवली बुद्रुक 1, मठाचीवाडी 1, मिरेवाडी 1, पिंप्रद 1, पाडेगाव 2, रावडी 1, राजुरी 1, सासवड 1, सोमंथळी 1, डोंबाळवाडी 2, दुधेबावी 1, चव्हाणवाडी 1, शिंदी खुर्द 1, निंबुत तालुका बारामती 1, वानेवाडी बारामती 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.

No comments