प्रविण जाधव ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावतील - श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर
![]() |
| प्रविण जाधव यांच्या मातापित्यांचा सत्कार करताना आ. दिपकराव चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर |
फलटण - : ऑलिंपिक स्पर्धेसाठी जाणाऱ्या भारतीय संघात सरडे, ता. फलटण या छोट्या खेड्यातील प्रविण जाधव या तरुणाची निवड प्रेरणादायी असून सातारा जिल्हा वासीयांसाठी ही अभिमानास्पद बाब असल्याचे नमूद करीत प्रविण जाधव हे स्पर्धेतील यश खेचून आणतील असा विश्वास महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे.
सरडे ता. फलटण येथील धर्नुविद्या खेळाडू प्रविण जाधव यांची टोकिओ (जपान) येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते प्रविणचे वडील रमेश जाधव व आई सौ. संगीता जाधव यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. आ. दिपकराव चव्हाण समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते.
सातारा जिल्ह्यातील ललिता बाबर यांच्या नंतर आपल्या गावातील प्रविण जाधव यांना ऑलिंपिक मध्ये खेळण्यासाठी संधी मिळाली आहे, अनेक अडथळे दूर करुन प्रविण जाधव यांनी ऑलिंपिक मध्ये स्थान निश्चित केले आहे, सातारा जिल्ह्यातील प्रख्यात कुस्तीवीर खाशाबा जाधव यांच्यानंतर प्रविण जाधव या स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावून देशाचे नाव जागतिक स्पर्धेत उंचावतील असा विश्वास व्यक्त करीत सातारा जिल्हा वासीयांच्यवतीने श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी प्रविण जाधवला शुभेच्छा दिल्या.
ज्या खेळाची सर्व सामान्यांना माहिती नाही अशा धर्नुविद्या खेळात प्रविणने मिळविलेले यश अभिमानास्पद आहे त्याचबरोबर गावातील विविध विद्यार्थिनींनी त्यांच्या आवडीच्या खेळात मिळविलेले यश आणि त्यांची क्रीडा प्रबोधनी मध्ये झालेली निवड कौतुकास्पद असल्याचे सांगून श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी या चार ही विद्यार्थिनींचे कौतुक करीत त्यांना खेळातील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
![]() |
| क्रीडा प्रबोधिनीसाठी निवड झालेल्या विद्यार्थिनींचा सत्कार करताना आ. दिपकराव चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर |
जिल्हा परिषद प्रा. शाळा, सरडे येथील तत्कालीन प्रा. शिक्षक विकास भुजबळ (सध्या जिल्हा परिषद प्रा. शाळा कोचरेवाडी ता.पाटण) व सौ. शुभांगी विकास भुजबळ (सध्या जिल्हा परिषद प्रा.शाळा श्रीरामवाडी सोनवडी बुद्रुक ता. फलटण) यांनी क्रीडा प्रबोधिनी अमरावती येथे प्रविण जाधवची निवड होईपर्यंत अथक परिश्रम घेतल्याचे नमूद करीत प्रविण जाधवला धनुर्विद्येमध्ये आवड निर्माण करुन त्याला प्रशिक्षण देण्यासाठी भुजबळ पती-पत्नीचे योगदान मोठे असल्याचे नमूद करीत श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांना धन्यवाद दिले.
आ. दिपकराव चव्हाण व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते राष्ट्रीय खेळाडू कु. पूजा शेंडगे (हॉकी), कु. स्वाती जाधव (हॉकी), कु. ऐश्वर्या बेलदार (जिम्नॅस्टिक), कु. पूजा जोरवर (टेबल टेनिस) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सभापती दत्तात्रय गुंजवटे, श्रीरामचे संचालक महादेव माने, माजी संचालक सुखदेव बेलदार, संभाजी निंबाळकर, सुरेश बेलदार, माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य दत्ता भोसले, उपसरपंच महादेव विरकर, नवनाथ धायगुडे, संजय जाधव, सत्यवान धायगुडे, कांतीलाल बेलदार, विशाल मोरे, मारुती चव्हाण, काळूराम चव्हाण, सुभेदार शेंडगे, नाना चव्हाण, सचिन घोलप आणि ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments