Breaking News

वैशाली शिंदे यांची ग्राहक संरक्षण समितीच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड

Vaishali Shinde selected as State Vice President of Consumer Protection Committee

    फलटण  (प्रतिनिधी) : भारत सरकार व नीती आयोग, भारत सरकार यांच्याकडे नोंदणीकृत असलेल्या सोशल फाउंडेशन संचलित ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या ऑनलाईन बैठकीमध्ये, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी फलटण येथील आयडियल किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या वैशाली शिंदे यांची निवड करण्यात आली असल्याचे समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांनी सांगितले.

    सध्या कोरोना काळात ग्राहक, रुग्ण यांची विविध स्तरावर होणाऱ्या आर्थिक लूटीबाबत ग्राहक, रुग्ण यांची होणारी आर्थिक, मानसिक पिळवणूक थांबविणे कामी, पदाधिकारी यांनी सतर्क राहणे आवश्यक असल्याचे सांगून दादाभाऊ केदारे यांनी ग्राहक हिताच्या भावी कार्यासाठी वैशाली शिंदे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

    यावेळी राज्य अध्यक्ष प्रकाश घोळवे यांनी ग्राहक ( उपभोक्ता ) संरक्षण समितीच्या पदाधिकारी यांचे अधिकार व कर्तव्य याबाबत मार्गदर्शन करून राष्ट्रीय अध्यक्ष व राजाध्यक्ष, हे सर्व पदाधिका-यां च्या पाठीशी ठाम उभे राहणार असल्याचे सांगितले. ऑनलाईन बैठकीमध्ये राष्ट्रीय महासचिव राजेश ऑनलाईन बैठकीमध्ये आंधळ, प्रकाश घोळवे, सत्यजित जानराव, प्रतिभा शिर्के, प्रविण घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

    राज्य कार्याध्यक्ष निवृत्ती रोकडे यांनी उपस्थित पदाधिका यांचे आभार मानले. सदर बैठकीसाठी राज्य व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.

No comments