Breaking News

मुरूम उत्खनन करून चोरी व पर्यावरणाचा ऱ्हास ; एकावर गुन्हा दाखल

Theft to illegal Murum Soil  ; Filed a crime against one

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. १९ जून -  मौजे सांगवी ता.फलटण गावचे हद्दीत शासकीय परवानगी न घेता जेसीबीच्या सहाय्याने अवैधरित्या मुरुमाचे उत्खनन करून, चोरी करण्याचा प्रयत्न केला तसेच पर्यावरणाचा ऱ्हास केल्याप्रकरणी, संजय प्रल्हाद साळवे रा. अंबिकानगर पणदरे बारामती जि. पुणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १५ जून २०२१ रोजी रात्रौ १०.४५ वाजण्याच्या सुमारास मौजे सांगवी ता. फलटण गावचे हद्दीत गायरान जमीन गट नं. ४१२ मध्ये जेसीबी क्र. MH 09 CL0185 व त्यावरील चालक संजय प्रल्हाद साळवे रा. अंबिकानगर पणदरे बारामती जि. पुणे याने  कोणताही शासकीय परवानगी न घेता बेकायदेशीर मुरुमाची चोरी करण्याच्या उददेशाने उत्खनन करुन चोरीचा प्रयत्न केला व पर्यावरणाचा -हास केला आहे. याप्रकरणी संजय प्रल्हाद साळवे यांच्यावर आयपीसी व पर्यावरण संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    अधिक तपास पोलिस हवालदार ए.एस. कर्णे करीत आहेत.

No comments