Breaking News

जातीयवाचक शिवीगाळ करून महिलेस अश्लील व्हिडीओ पाठवला ; दोघांवर गुन्हा

Sent obscene videos to women with racist insults; Atrocities against both

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. १७ जून २०२१ - भाड्याने रुम घेऊन दिली नाही व भावाचा  मोबाईल नंबर देण्यास नकार दिल्याने, कोळकी ता. फलटण येथील महिलेस जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली व  मोबाईलच्या ट्रू-कॉलर ॲप द्वारे अश्लील मेसेज व अश्लील व्हिडीओ क्लिप पाठवल्या प्रकरणी भाऊ पाटील व सुजाता यादव यांच्या विरोधात विनयभंग व ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान भाऊ पाटील याने सदर पीडित महिलेस केलेल्या जातीवाचक शिवीगाळीचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यामुळे, विविध सामाजिक संघटनांनी व कार्यकर्त्यांनी या प्रकरणी लक्ष घालून,आरोपीस त्वरित अटक करण्याची मागणी केली होती. सदर गुन्ह्याची नोंद फलटण शहर पोलीस स्टेशनला होताच, पोलिसांनी तातडीने आरोपीस अटक करून तपासास गती दिली. https://www.gandhawarta.com/

    दिनांक ९ जून २०२१ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कोळकी तालुका फलटण येथे पीडित  महिलेच्या राहत्या घरासमोर तसेच पीडित महिलेच्या मोबाईलवर भाऊराव पाटील व सुजाता यादव यांनी, त्यांच्या मोबाईल वरून जातीवाचक शिवीगाळ करत, तू तुझ्या भावाचा फोन नंबर का देत नाहीस, तुला लय मस्ती आली आहे का, असे म्हणून, जातीवाचक  शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्या वेळी सुजाता हिने देखील शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली व तेथून निघून गेल्यानंतर, थोड्यावेळाने रात्री ९:५१  वाजण्याच्या सुमारास भाऊराव पाटील याने त्याच्या मोबाइल क्रमांकावरून पीडित  महिलेच्या मोबाईलवर आई वरून अश्लील शिवीगाळ केली. तसेच जातीवाचक शिव्या वारंवार दिल्या. तसेच मोबाईलवर ट्रू कॉलर ॲप वर वाईट हेतूने अश्लील मेसेजेस व अश्लील व्हिडिओ पाठवून पीडित महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याची फिर्याद कोळकी येथील पीडित महिलेने दिली आहे. त्यानुसार फलटण शहर पोलीस स्टेशनला भाऊराव पाटील व सुजाता यादव यांच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत व आयपीसी कलम 354 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

     सदर गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बरडे करीत आहेत.

    दरम्यान पोलिसांनी तातडीने आरोपीस अटक करून, न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

No comments