Breaking News

फलटणचे निवासी नायब तहसीलदार रमेश पाटील यांना तहसीलदार पदावर पदोन्नती

Phaltan resident Deputy Tehsildar Ramesh Patil promoted to Tehsildar post

     फलटण -: फलटणचे निवासी नायब तहसीलदार रमेश चिं. पाटील यांना तहसीलदार पदी पदोन्नती देण्यात आली असून या पदोन्नतीबद्दल त्यांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.

   नायब तहसीलदार (गट ब) संवर्गातील अधिकाऱ्यांना तहसीलदार संवर्गात तदर्थ पदोन्नती देण्याबाबत राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाने दि. १६ जून  काढलेल्या शासन आदेशानुसार पुणे विभागातील नायब तहसीलदार (गट ब) संवर्गातील १७ अधिकाऱ्यांना तहसीलदार (गट अ) मध्ये पदोन्नती देण्यात आली आहे. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील २ नायब तहसीलदारांचा समावेश आहे.

No comments