Breaking News

चोरी - घरफोडी गुन्ह्यात वाढ ; नागरीकांनी घरामध्ये दागदागिने - रोख रक्कम ठेवु नये - पोलीस निरीक्षक नितीन सावंत

 Increase in Theft and burglary crime; Citizens should not keep jewelery - cash in the house - Police Inspector Nitin Sawant

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. १९ जून -  फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन हददीत राहणाऱ्या नागरीकांना अवाहन करणेत येतेकी, सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत व सध्या पोलीस स्टेशन हददीत चोरी, घरफोडी सारखे गुन्हे होण्याच्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्यामुळे नागरीकांनी आपल्या जवळ तसेच घरामध्ये जास्त मौल्यवान वस्तु, दागदागिने, रोख रक्कम ठेवु नये, ती बँकेचे लॉकर मध्ये ठेवावी. अगर आपले घरामध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवावी जेणे करून, आपल्या घरामध्ये चोरी झालीच तर, ती चोरटयांचे हाताला लागु नये. जर आपण आपले घर बंद करुन बाहेर गावी मुक्कासाठी जाणार असेल तर तसे आपल्या शेजारी राहणाऱ्या लोकांना, तसेच शेजारील पोलीस स्टेशनला कळवावे म्हणजे रात्रगस्त दरम्यान आपल्या बंद घराकडुन पोलीस पेट्रोलिंग करणेत येईल असे आवाहन फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी केले आहे आहे.

    तसेच गावचे पोलीस पाटील यांनी आपापले गावातील ग्रामसुरक्षादल कार्यान्वीत करुन, ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य यांच्या संख्ये प्रमाणे रात्रगस्तीचे नियोजन करुन, आपापले गावात रात्रगस्त सुरु करावी. जर गावात कोणी अनोळखी व्यक्ती अगर कोणी नवीन फिरस्ता व्यक्ती दिसला, तर तो कोण आहे ? कुठुन आला आहे ? याबाबत चौकशी करावी व त्याचा फोटो काढुन ठेवावा, तसेच जर त्याच्यावर संशय असेल तर तसे पोलीस स्टेशनला कळवावे असेही  पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी सांगितले आहे.

No comments