Breaking News

कोयनानगर येथे राज्य आपत्ती दल बचाव पथक केंद्र स्थापनेबाबतच्या प्रस्तावावर गृह विभागाने तात्काळ कार्यवाही करावी – शंभुराज देसाई

Home Department should take immediate action on the proposal for setting up of State Disaster Rescue Squad Center at Koynanagar - Shambhuraj Desai

    मुंबई - : धुळे व नागपूर जिल्ह्याच्या धर्तीवर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात स्टेट डिझास्टर रेस्क्यू फोर्स (राज्य आपत्ती बचाव दल) केंद्राची स्थापना करण्यासाठी गृह विभागाने तात्काळ शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी दिले.

    मंत्रालयातील दालनात  सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात स्टेट डिझास्टर रेस्क्यू फोर्स (राज्य आपत्ती बचाव दल) केंद्र सुरू करण्याबाबत गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभुराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पोलीस महासंचालक संजय पांडे, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद लिमये, अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशिक्षण) संजय कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक (नियोजन) एस जगन्नाथन, गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट उपस्थित होते.

    राज्यमंत्री श्री.देसाई म्हणाले, कोयनानगर येथे स्टेट डिझास्टर रेस्क्यू फोर्स  (राज्य आपत्ती बचाव दल) हे केंद्र झाल्यास सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील पूरप्रवण क्षेत्रात तात्काळ मदत मिळण्यासही सोयीस्कर होणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणात येणाऱ्‍या पर्यटकांची सुरक्षा व समन्वय राखण्यासाठी देखील या केंद्राची मदतच होईल. गृह विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे तात्काळ सादर करावा, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

    यावेळी पोलिस महासंचालक यांनी स्टेट डिझास्टर रेस्क्यू फोर्स (राज्य आपत्ती बचाव दल) याबाबत कशा प्रकारे गृह विभाग प्रस्ताव सादर करत आहे याची माहिती बैठकीत सादर केली.

No comments