Breaking News

'फ्लाईंग सिख' मिल्खा सिंह यांचे निधन

'Flying Sikh' Milkha Singh passes away

     नवी दिल्ली : भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह यांचे निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्याच आठवड्यात त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे निधन झाले. मिल्खा सिंह फ्लाईंग सिख नावाने प्रसिद्ध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

    मिल्खा सिंह  यांना 19 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. परंतु अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना चंदीगढच्या PGI रुग्णालयत भरती करण्यात आले. आॅक्सिजन लेव्हल 56 पर्यंत गेली होता जिथे काल (18 जून) रात्री 11.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली गेल्याच आठवड्यात पत्नीचे निधन झाले होते. परंतु आयसीयूमध्ये असल्याने पत्नीच्या अंत्यसंस्कारासाठी त्यांना उपस्थितीत राहता आले नाही.

No comments