Breaking News

कोरोना रुग्णांकडून जादा बिल आकारणी ; फलटण मधील तीन हॉस्पिटलला 3 लाख 43 हजार रुपये परत करण्याचे आदेश

Extra billing from corona patients; Order to return Rs 3 lakh 43 thousand to three hospitals in Phaltan

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण -  कोरोना बाधित रुग्णांकडून जादा बिलाची आकारणी केल्या प्रकरणी, फलटण मधील  निकोप हॉस्पिटल, लाईफ लाईन हॉस्पिटल आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल यांना जादा आकारणी केलेल्या बिलाचे एकूण 3 लाख 43 हजार 650 रुपये, परत करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. 

    फलटण तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपचाराची देयके पथकामार्फत तपासणी करण्यात आली. यामध्ये फलटण शहरातील 9 रुग्णालयांचे ऑडिट करून, एकूण 964 देयके तपासण्यात आली. त्यामध्ये 100 देयकांमध्ये तफावत आढळून आली. निकोप हॉस्पिटलच्या 52 बिलांमध्ये तफावत आढळून आली असून त्याचे एकूण 2 लाख 25 हजार 900 रुपये  परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लाईफ लाईन हॉस्पिटल चे 35 बिलांमध्ये तफावत आढळून आले असून, त्याचे एकूण 82 हजार 550 रुपये परत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सिद्धिविनायक हॉस्पिटल च्या एकूण 13 बिलांमध्ये तफावत आढळून आले असून त्याचे 35 हजार 200 रुपये परत देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. असे एकूण 3 लाख 43 हजार 650 रुपये  हॉस्पिटल व्यवस्थापनास परत करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी कळवले आहे.

    आतापर्यंत ९६४ देयके तपासण्यात आली असून पुढील देयके तपासण्याची सदरची प्रक्रिया सुरु आहे. इन्शुरन्सची देयके वगळता इतर देयके तपासणी करण्यात येत आहेत. ज्यादा रक्कम परत करण्यासाठी तहसीलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. देयकांची माहिती प्रांत कार्यालयात उपलब्ध आहे. रुग्ण किंवा रुग्णाचे जवळचे नातेवाईक यांना पाहण्यास उपलब्ध करुन दिली जातील असे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी कळवले आहे.

No comments