श्रीराम बाजारचे शटर उचकटून १ लाख ३२ हजाराची रोखड लंपास
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. १९ जून - श्रीराम बझार, महात्मा फुले चौक फलटण येथील गोडाऊनचे पाठीमागील शटर उचकटुन आत प्रवेश करून, तिजोरीमधील रोख रक्कम व चिल्लर अशी एकुण १ लाख ३२ हजार २६६ रुपये अज्ञात चोरट्याने लंपास केले आहेत. दरम्यान चोरीस गेलेल्या रक्कमे पैकी ५०,०००/- ( पन्नास हजार ) रुपये घटनास्थळी मिळुन आलेले आहेत.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १७ जून २०२१ रोजी दुपारी ४:३० ते १८ जून २०२१ रोजी सकाळी ७:३० वाजण्याच्या दरम्यान श्रीराम बझार, महात्मा फुले चौक फलटण येथील गोडाऊनचे पाठीमागील शटर कशानेतरी उचकटुन, अज्ञात चोरटयाने आत प्रवेश करुन, तिजोरीमधील रोख रक्कम व चिल्लर अशी एकुण १ लाख ३२ हजार २६६ रुपये चोरून नेले असल्याची फिर्याद विनायक बाबुराव शिंदे यांनी दिली आहे. चोरीस गेलेल्या रक्कमे पैकी ५०,०००/- ( पन्नास हजार ) रुपये घटनास्थळी मिळुन आलेले आहेत.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत.

No comments