Breaking News

झिरपवाडी ग्रामीण रुग्णालय सुरू होणार - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

Zirapwadi Rural Hospital to be started - Deputy Chief Minister Ajit Pawar's instructions

   फलटण (प्रतिनिधी) -  झिरपवाडी (ता. फलटण) येथील   सध्या बंद असलेल्या ग्रामीण रुग्णालय इमारतींची दुरवस्था झाली असून त्याची तातडीने दुरुस्ती करण्याच्या मागणीला तत्त्वतः पाठिंबा देत पाहणी करून त्वरित अहवाल सादर करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित यंत्रणांना दिले आहेत.

    सातारा येथे सातारा जिल्हा कोविड व्यवस्थापन आढावा बैठक उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मिटिग संपन्न झाली यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक विषायावर चर्चा झाली यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री बाळासाहेब पाटील व गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण, माण तालुक्यातील कोरोना परिस्थितीवर भुमिका मांडली. यावेळी फलटण तालुक्यात १९९७ साली झिरपवाडी येथे ८ एकर जागेत रुग्णालय बांधण्यात आले.  त्यामध्ये रुग्णालय इमारत, डॉक्टरांची निवास व्यवस्था केली होती. परंतु राजकीय दृष्ट्या याचे उद्घाटन होऊ शकले नाही .फलटण तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने हे रुग्णालय सुरू होणे खूप गरजेचे आहे, या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कारखानदारी असल्यामुळे, ऊस तोडणी कामगार सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये फलटणला येत असतात. त्यामुळे सामान्य जनतेसाठी हे हॉस्पिटल सुरू होणे गरजेचे आहे, यासाठी मी जिल्हा नियोजन मध्ये याबाबत प्रस्ताव दाखल केला आहे, तरी याबाबत पुढे  काही झाले नाही असे निदर्शनास अणुन देताच, उपमुख्यमंत्री यांनी तातडीने दखल घेऊन जिल्हाधिकारी व बांधकाम विभाग चे अधिक्षक अभियंता, सिव्हिल सर्जन, यांना आदेश दिले व तातडीने हे रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत व  अहवाल देण्या च्या सुचना दिल्या.  

      खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर  यांच्या उपस्थितीत   ग्रामीण रुग्णालयाची पाहणी करण्यात आली. यावेळी अधीक्षक अभियंता मुंगीलवर तथा ग्रामीण रुग्णालया कडून शुक्ला, डॉ धुमाळ, उप अभियंता नामदे यांनी आज पाहाणी करून, दुरुस्तीबाबत प्रस्ताव दाखल केला. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी खासदार रणजितसिंह यांना रुग्णालयास ७.८५ कोटी निधी उपलब्ध करून दिले जाईल असे सांगितले. तसेच हे  रुग्णालय शासनच चालविणार आहे असे उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे. यामुळे फलटण,माण खटाव माळशिरस  या भागातील गोरगरीब जनतेला याचा फायदा होणार आहे. या बाबत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे फलटण तालुक्याचे वतीने मनःपूर्वक आभार मानले, तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या रुग्णालयास स्वतःच्या फंडातून 50 लाख रुपयांचा निधी वर्ग करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी महोदय यांना केल्या आहेत. 

    झिरपवाडी ग्रामीण रुग्णालयाच्या पाहणी प्रसंगी भाजपा पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, युवानेते अभिजीत नाईक निंबाळकर, नगरसेवक अशोकराव जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष नानासो ईवरे, भटक्या विमुक्त जाती जमाती सेलचे तालुकाध्यक्ष सुनील जाधव, झिरपवाडीचे   ग्रामपंचायत सदस्य रवी टेंबरे, ग्रामपंचायत सदस्य शिवा गुंजवटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments