लसीकरण न झाल्यानेच दुसरी लाट प्रचंड वेगाने आली - चंद्रकांतदादा पाटील
फलटण येथे कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटरचा शुभारंभ
फलटण (प्रतिनिधी) - पहिली लाट गेल्यानंतर लसीकरण सुरु झाले परंतु लसीकरणासाठी सर्वच नागरिकांनी पाठ फिरवली आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरण न झाल्याने दुसरी लाट प्रचंड वेगाने आली आहे. ह्या लाटेमध्ये अन्नधान्य व इतर आवश्यकता कमी आहेत. यापेक्षा कोरोना केअर सेंटर काढणे, सुरु करणे गरजेचे आहे असे मत लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर या सेंटरचे उदघाटन ऑनलाईन पद्धतीने करताना भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केले.
पुढे ते म्हणाले की, पक्षाचा आदेश मानून आमदार जयकुमार गोरे व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी कोरोना केअर सेंटर सुरु केले आता ही लाट ओसरल्यानंतर सुद्धा आपण थांबून चालणार नाही. कोरोनाच्या दुसरी लाट हि इतकी भयंकर असेल असे कोणालाही वाटले नव्हते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत डॉक्टर व कोरोना केअर सेंटरची आवश्यकता मोठ्या प्रमाणावर लागत आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीने प्रत्येक खासदार व आमदार यांनी एक कोरोना केअर सेंटर सुरु करण्यास सांगितले. देशाने पोलिओ या आजरावर मात केली. ह्या प्रमाणेच डेंग्यू, मलेरिया व इतर आजार गेले असे झालेले नाही व कोरोनाच्या बाबतीत सुद्धा कोरोना गेला असा होणार नाही. दुसरी लाट गेल्यावर तिसरी लाट येणार नाही, असे कोणालाही सांगता येणार नाही. आता उभे करत असलेलो कोरोना केअर सेंटर हे काही दिवसांनी ओस पडली तरी ते बंद करून चालणार नाही. एक संघर्षशील नेता अशी ओळख माजी खासदार कै . हिंदुराव नाईक निंबाळकर होती, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
लोकनेते कै . हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर या सेंटरचे उदघाटन ऑनलाईनने भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला व प्रत्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न झाला. या वेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर , आमदार जयकुमार गोरे, जिल्हा परिषद सदस्या सौ . जिजामाला नाईक निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ .शिवाजी जगताप , तहसीलदार समीर यादव , वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्यंकट धवन, गटविकास अधिकारी डॉ. अमिता गावडे , विश्वास भोसले, जयकुमार शिंदे, अशोकराव जाधव ,अनुप शहा, बजरंग गावडे, अमोल सस्ते, नानासो इवरे, डॉ . प्रवीण आगवणे, अभिजित नाईक निंबाळकर, मनोज कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
फलटण शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने लोकनेते कै . हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर आपण सुरु करत आहोत . लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर सुरु करत आहोत कारण म्हणजे फलटण तालुक्यामध्ये रोज सुमारे ४०० रुग्ण नव्याने दाखल होत आहेत त्या मुळे कोरोना हेल्थ केअर सेंटर सुरु करणे गरजेचे झालेले होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी हि कार्यरत आहेत. माढा मतदारसंघातील प्रत्येक ग्रामपंचायतीला सॅनिटायझर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही दिलेली आहेत . आता येणाऱ्या रमजान ईद या सणानिमित्त माढा मतदारसंघातील असणाऱ्या प्रमुख शहरांमध्ये दुधाचे वाटप करणार आहोत. सर्वानी एकत्रीत येऊन जर आपण काम केले तर आणि तरच आपण कोरोनाला हद्दपार करू, असा विश्वास माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या वेळी व्यक्त केला.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्ना मुळे लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर सुरु होत आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी कोरोना केअर सेंटर सुरु केलेले आहेत व आगामी काळात सुद्धा सुरु होत आहेत. कोरोनाचे संकट किती दिवस राहणार आहे, हे आपल्याला माहित नाही. सरकारी व खाजगी रुग्णालये आता कमी पडत आहेत. गरीब माणूस खाजगी हॉस्पिटल मध्ये जाऊ शकत नाही. या मुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. लसीकरण करताना शेजारच्या जिल्ह्यातील नागरिक येऊन लस घेऊन जातात. राज्य सरकारच्या निष्काळजी पणा मुळे लसीकरणामध्ये अनेक त्रुटी शिल्लक आहेत. लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे . ह्या मध्ये राज्य सरकारने त्रुटी दूर करणे आवश्यक आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माढा लोकसभा मतदारसंघात पूर्ण ताकदीने कोरोनाच्या विरोधात लढा देत आहेत, असे मत आमदार जयकुमार गोरे यांनी व्यक्त केले.
फलटण तालुक्यात अजूनही रोज सुमारे ३०० रुग्ण कोरोनाबाधित होत आहेत कोरोनाने थैमान घातलेले आहे. सरकारी व खाजगी असे एकूण मिळून ९ हॉस्पिटल कार्यरत असून सुद्धा सध्या बेड्ससाठी वाट बघत बसावी लागत आहे. लोकनेते कै. हिंदुराव नाईक निंबाळकर कोरोना हेल्थ केअर सेंटर ह्या सेंटर मुळे फलटण तालुक्यातील सर्व सामान्य नागरिकांना नक्कीच फायदा होईल, असे मत प्रांताधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी व्यक्त केले.
No comments