बॉडी बिल्डर अमीर सय्यद यांच्याकडून नागरिकांच्या सेवेसाठी अँबुलन्स लोकार्पण
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. १४ मे २०२१ - सातारा जिल्ह्यातिल प्रसिद्ध बॉडी बिल्डर महाराष्ट्र श्री आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार विजेते अमीर अब्दुलकरीम सय्यद यांनी यावर्षी होणाऱ्या रमजान ईद सणाचा व आपल्या वाढदिवसावर होणारा संपूर्ण खर्च टाळून, रुग्णांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण केली आहे. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
सध्याच्या कोव्हीड काळात सर्व जाती-धर्माच्या लोकांना आरोग्य सेवा वेळेत व योग्यरीतीने मिळावी यासाठी अमीर सय्यद यांनी रुग्णवाहिका घेऊन, आज रमजान ईदच्या शुभमुहूर्तावर रुग्णवाहिका लोक सेवेसाठी लोकार्पण केली. सर्वज्ञ ॲम्बुलन्स सर्विस चे सर्वेसर्वा कुमार प्रकाश काळे व अमीर सय्यद यांच्या शुभहस्ते लोकार्पण सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमासाठी युसुफ अब्दुल करीम सय्यद, श्री सुनील सस्ते सर, प्रा. शंकर जठार , श्री बंडू खुरंगे, श्री राजेंद्र शिंदे, श्री रणजीत शेटे, कैलास मुजुमले, श्री कळंबे या मोनिता विश्व सोसायटीचे संचालक मंडळ व सर्व सभासद उपस्थित होते.
लोकार्पण सोहळ्याचे प्रस्ताविक प्रा. शंकर जठार यांनी केले, व आभार राजेंद्र शिंदे यांनी मानले, सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
No comments