Breaking News

फलटण शहर व तालुक्यातही 31 मे पर्यंत निर्बंध वाढवले

Restrictions were extended till May 31 in Phaltan city and taluka

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. १५ मे २०२१ - सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने सद्य स्थितीत लागू असलेली निर्बंध दिनांक 1 जून रोजी पर्यंत वाढवण्यात आले  आहेत, त्याअनुषंगाने फलटण शहर व तालुक्यातही सद्यस्थितीत लागु असलेले निर्बंध  दिनांक 31 मे पर्यंत वाढवण्यात आले असल्याचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी कळवले आहे.

 फलटण शहर व तालुक्यात पुढीलप्रमाणे स्थिती राहील :- 

     किराणा, भाजीपाला, दूध, बेकरी इ दुकाने पूर्णत: बंद राहतील मात्र सकाळी ७ ते सकाळी ११ दरम्यान घरपोच सेवा देता येतील.

     हॅाटेल, रेस्टोरंट इ पूर्णत: बंद राहतील, मात्र दु १२ ते सायं ८ वाजेपर्यंत घरपोच सेवा देता येईल.

    कृषी अवजारे व शेती उत्पादनाशी संबंधीत दुकाने सकाळी ७ ते ११ सुरु ठेवता येतील. सायं ५ वाजेपर्यंत घरपोच सेवा देता येईल.

    इतर सर्व दुकाने बंद राहतील असे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी कळवले आहे.

No comments