Breaking News

फलटण कोरोना लसीकरण : आजची स्थिती

Phaltan corona vaccination: today's situation

    गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि.9 मे 2021 - मुधोजी हायस्कूल फलटण येथे उपजिल्हा रुग्णालयामार्फत फलटण शहरातील नागरिकांसाठी लसीकरण करण्यात येत आहे. आज १८ ते ४४ वर्षे वयोगट - फक्त कोवॅक्सीन लस उपलब्ध आहे. व ज्या व्यक्तींनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले आहे त्या यादीमध्ये नमूद २०० व्यक्तींनाच लस दिली जाणार आहे. यादीमध्ये नाव नसलेल्या व्यक्तींनी केंद्रावर गर्दी करु नये.

    ४५ व अधिक वर्षे वयोगट- कोविशिल्ड लस उपलब्ध नसल्याने दि ९/५/२०२१ रोजी लसीकरण होणार नाही. तसेच ४५ वर्षे व अधिक वयोगट व कोवॅक्सीन चा दुसरा डोस असणाऱ्या व्यक्तींना दि ९/५/२०२१ रोजी लसीकरण नाही. त्याबाबत नंतर माहिती दिली जाईल. 

    तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, फलटण ( बाहुली शाळेजवळ) आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण व उपकेंद्र याठिकाणी आज दिनांक  ०७/०५/२०२१ रोजी कोणतीही लस उपलब्ध नसल्याने लसीकरण पूर्ण बंद राहणार असल्याचे उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी जाहीर केले आहेत.

No comments