रमजान ईद निमित्त दुकाने खुली ठेवण्यास परवानगी द्यावी - मागणी
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण - भारतीय जनता पार्टी अल्पसंख्यांक मोर्चा च्या वतीने खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार व मुस्लिम संघटना यांच्याकडून दिनांक 13 व 14 रोजी रमजान ईद निमित्त दुकाने खुली ठेवण्यास परवानगी देण्यात यावी याबाबत निवेदन तहसीलदार फलटण यांच्याकडे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यांक सरचिटणीस अनुप शहा, फलटण तालुका अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष रियाज इनामदार, अहद सामाजिक विकास संस्था फलटण अध्यक्ष मेहबूबभाई मेटकरी, शहर अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष बबलू मोमीन, फलटण तालुका व्यापारी आघाडी भाजपा अध्यक्ष वसीम मणेर, जमशेदभाई पठाण, मुस्ताकभाई कोतवाल, कदिरभाई मुजावर उपस्थित होते.

No comments