Breaking News

फलटण येथे रेमडीसिव्हर इंजेक्शनचा काळा बाजार करणारी टोळी जेरबंद

Black market gang of remedicator injections arrested in Phaltan

  गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि.9 मे 2021 - रेमडीसिव्हर इंजेक्शनचा काळाबाजार करत एक इंजेक्शन  35 हजार रुपयांना विक्री करत, असताना टोळीस फलटण शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. या पाठीमागे मोठी टोळी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  दिनांक ०८.०५.२०२१ रोजी रात्री २३.३० वाजणेचे सुमारास पोलीस निरीक्षक भारत किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस ठाणे गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, इसम नामे सुनिल विजय कचरे मोनं. ९१४५१३२३९७ हा सुविधा हॉस्पीटल जवळ स्वतःचे आर्थीक फायदया करीता कोविड १९ विषाणुच्या आजारावर लागणा-या Remdesivir Injection ची बॉटल (व्हायल) सातारा जिहयात प्रादुर्भाव रोखण्या करीता लॉकडाऊन घोषीत असताना, ती औषधे, त्यावरील छापील किमतीपेक्षा अधिक किमतीने विक्री करून, त्या औषधाचा काळा बाजार करीत आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच श्री. अरूण सखाराम गोडसे, हुद्दा औषध निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन सातारा फलटण शहर पोलीस ठाणे यांना बोलावून घेवून त्यांना सदर बातमीचा आशय कळवून,  त्यानुसार पोलीस स्टेशन मधील पोउनि अमोल कदम यांना बनावट गि-हाईक म्हणून काम पाहणारे यांना समक्ष Remdesivir Injection या इंजेक्शनची अधिक किंमतीने विक्री करणा-या इसमांचा मोबाईल क्रमांक ८०१०५४१६५७ या क्रमांकावर बनावट गिर्हाईक यांचा मोबाईल क्रमांक सुनिल विजय कचरे मोनं. ९१४५१३२३९७ यावरून मोबाईल फोनचा स्पिकर चालू करून, समोरून बोलणारे इसमाने बोलताना Remdesivir Injection या इंजेक्शनची १ बाटली असल्याचे सांगून प्रत्येक बाटलीस ३५,०००/- रूपये या प्रमाणे विक्री करीत असल्याचे सांगितले.  त्यावेळी बनावट गिर्हाईक यांनी त्यांचे कडून १ इंजेक्शन खरेदी करण्यास होकार दर्शविला असता,  फोनवर बोलणाऱ्या समोरील इममाने मगर हॉस्पीटल चे पाठीमागे, लक्ष्मीनगर फलटण येथे लवकरात लवकर येण्यास सांगितले.  त्याप्रमाणे उपस्थित पंच श्री. अरूण सखाराम गोडसे, औषध निरीक्षक श्री. भारत किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर, एस.के. राऊळ सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमोल कदम पोलीस उपनिरीक्षक, एस.एन. भोईटे सहाय्यक फौजदार, व्ही. पी. ठाकूर पोलीस हेड कॉन्स्टेबल, एस.डी. सुळ पोलीस नाईक, एन. डी. चतुरे पोलीस नाईक, व्ही.के.लावंड पोलीस नाईक, ए. एस. जगताप पोलीस शिपाई, हे सदर ठिकाणी रवाना होवून सापळा लावून थांबले.

  तसेच बोगस गि-हाईक श्री अमोल कदम पोउनि फलटण यांनी त्यांचे मोबाईल वरून विक्री करणारे इसमांचे मोबाईल वर कॉल केला असता, त्याने पुढे काही अंतरावर मी एका मोटार सायकल वर बसलेलो आहे असे सांगितले. त्या प्रमाणे बनावट गिऱ्हाईक हे त्यांच्या खाजगी गाडीवर जावून, मोटार सायकल जवळ जावून, त्या इसमांशी बोलला व Remdesivir Injection रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या एका व्हायलची किंमत किती लागेल असे विचारले असता त्या इसमाने किंमत ३५०००/- हजार रूपये लागतील असे सांगून, त्यांचे जवळील Remdesivir Injection बनावट गि-हाईकास रूपये ३५०००/- रूपये किंमतीस विकत असताना त्यांचे मोबाईलची टॉर्च चालू केली असता, पोलीस पथक व पंच, औषध निरीक्षक यांनी छापा टाकला असता, Remdesivir Injection इंजेक्शन विक्री करणारा इसम पळून जात असताना, त्यास जागीच गराडा घालून पकडून ताब्यात घेवून त्यांचे नांव व पत्ता विचारला असता त्यांनी अनुक्रमे १) सुनिल विजय कचरे वय ३८ वर्षे व्यवसाय वॉर्ड बॉय सुविधा हॉस्पीटल फलटण रा नेर पुसेगांव ता. खटाव जि सातारा २) अजय सुरेश फडतरे वय ३४ व्यवसाय शेती रा. पिंप्रद ता. फलटण जि. सातारा असे असल्याचे सांगितले. सदरची इंजेक्शन कोठून आणली याबाबत विचारणा केली असता, सदरचे इंजेक्शन हे प्रविण मिस्त्री ऊर्फ प्रविण दिलीप सापते रा. घाडगेवाडी ता. फलटण जि. सातारा यांचे कडून आणली असले बाबत सांगितले. लागलीच पोलीस पथक पाठवून प्रविण सापते यांस ताब्यात घेतले असून, त्यांचे कडे विश्वासात घेवून तपास केला असता, त्याने सदरचे इंजेक्शन निखिल अनिल घाडगे रा. अनपटवाडी यांचे कडून आणली असले बावत सांगितले आहे. निखिल घाडगे यांस अटक करणेत आलेली आहे. वर नमुद टोळीचे एक मोठे रॅकेट असून, पेशंटचे नातेवाईकांचा असहाय्यतेचा गैरफायदा घेवून जास्त दराने Remdesivir Injection रेमडिसिव्हीर इंजेक्शन  काळ्या बाजाराने घेवून त्याची खरेदी विक्री  करणारांची टोळी सक्रीय असून, त्यांचा मुख्य सुत्रधार यांचा शोध घेऊन आरोपीची साखळी उघडकीस आणीत असल्याचे फलटण शहर पोलिसांनी जाहीर केले आहे. 

सदर कारवाई मा. श्री. अजय कुमार बंसल सोा पोलीस अधिक्षक सातारा, मा. श्री. धिरज पाटील सो अपर पोलीस अधिक्षक सातारा, मा. श्री. तानाजी बरडे सो उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण यांचे मार्गदर्शनाखाली श्री. भारत किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर, एस.के. राऊळ सहाय्यक पोलीस निरीक्षक, अमोल कदम पोलीस उपनिरीक्षक, एस. एन. भोईटे सहाय्यक फौजदार, व्ही. पी. ठाकूर पोलीस हेड कॉन्स्टेबल, एस. डी. सुळ पोलीस नाईक, एन. डी. चतुरे पोलीस नाईक, व्ही. एच. लावंड पोलीस नाईक ए. एस. जगताप पोलीस शिपाई यांनी केलेली आहे.

No comments