Breaking News

तारळे येथे १०३ किलो जिलेटीन जप्त ; ATC ची कामगिरी

103 kg gelatin seized at Tarle; ATC performance
     गंधवार्ता, वृत्तसेवा, दि. 13 मे 2021 - जिल्हा विशेष शाखा सातारा यांच्या अधिपत्याखालील दहशतवाद विरोधी पथकाने (ATC) दिनांक १२/०५/२०२१ रोजी गोपनीय माहितीच्या  तारळे ता.पाटण येथील गोविंदसिंग बाळुसिंग राजपुत (यादव) याच्या घरी छापा टाकला असता, त्यांना घरा पाठीमागे असलेल्या बाथरूम मध्ये व बोलेरो गाडी मध्ये १०३ किलो जिलेटीन कांड्या साठा करून ठेवलेल्या सापडल्या. राजपूत याच्यावर गुन्हा दाखल करून एकुण ३,०९,४५३/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
    श्री. अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा यांनी जिल्हयामध्ये स्फोटक पदार्थांचे बेकायदेशीरपणे होणारे साठे व त्यांची वाहतुक याबाबत माहिती काढुन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

    त्यानुषंगाने जिल्हा विशेष शाखा सातारा पोलीस निरीक्षक श्री. कुंभार यांना तारळे ता.पाटण या परिसरात बेकायदेशीररित्या स्फोटक पदार्थाचा साठा होत असल्याची गुप्त माहिती प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे . श्री. अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्री. धीरज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सातारा व श्री. विजय कुंभार, पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. प्रताप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा सातारा यांच्या अधिपत्याखालील दहशतवाद विरोधी पथकाने (ATC) दिनांक १२/०५/२०२१ रोजी तारळे परिसरात गोपनीय माहितीची खात्री करुन, तारळे ता.पाटण येथील गोविंदसिंग बाळुसिंग राजपुत (यादव) याने याच्या राहत्या घरी बेकायदेशीर स्फोटक पदार्थाचा साठा ठेवल्याची गोपनीय माहिती असल्याने नमुद व्यक्तीच्या घराची व आसपासच्या परिसराची झडती घेतली. गोविंदसिंग बाळुसिंग राजपुत (यादव) याच्या घराच्या पाठीमागील पत्र्याच्या कुलुपबंद शौचालयामध्ये खाकी रंगाचे चार बॉक्स आढळुन आले.सदर बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये जिलेटीनच्या कांडया (स्फोटक पदार्थ) आढळुन आल्या तसेच त्याचे घरासमोर उभ्या असलेल्या पांढन्या रंगाच्या बोलेरो या वाहनाची तपासणी केली असता सदर वाहनामध्ये पाठीमागील बाजुस सिटच्या खाली एका निळया रंगाच्या पिशवी मध्ये २९ जिलेटीनच्या कांडया व दुसऱ्या निळया रंगाच्या पिशवीमध्ये २७ डीटोनेटर्स वायरसह आढळुन आले.

    या संबंधाने सागर तानाजी भोसले, पोना/१०४३ ने. दहशतवाद विरोधी कक्ष सातारा यांनी यातील आरोपी विरुध्द स्वतःचे व लोकांच्या जिवितास धोका होऊ शकतो याची जाणीव असतानाही वरील नमुद ठिकाणी अधिकृत परवानगी शिवाय जाणीवपूर्वक जिवितास व मालमत्तेस गंभीर धोका पोहचु शकतो हे माहित असतानासुध्दा स्फोटक पदार्थांचा बेकायदेशीर साठा स्वतःजवळ बाळगुन लोकवस्ती मध्ये ठेवला म्हणुन दिलेल्या तक्रारी वरुन उंब्रज पोलीस ठाण्यास गु.र.नं. २४७/२०२१ भादंसंक-२८६, स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ४,५, भारतीय स्फोटक कायदा १८८४ चे कलम ९(ब)(१)(ब) अन्वये तारळे ता.पाटण येथील गोविंदसिंग बाळुसिंग राजपुत (यादव) याच्या विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. 

    या गुन्हयामध्ये एकुण (१) ९४५३/- रुपये किंमतीच्या एकुण ८३६ जिलेटीनच्या कांडया (स्फोटक पदार्थ वजन अंदाजे १०३ किलो) (२) ३,००,०००/- रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी असा एकुण ३,०९,४५३/- रुपये किंमतीचा वरील वर्णनाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

    मा. श्री. अयज कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा, मा. श्री. धीरज पाटील- अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्री. विजय कुंभार, पोलीस निरीक्षक जिल्हा विशेष शाखा सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष शाखा सातारा व दहशतवाद विरोधी कक्षा कडील श्री. प्रताप भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पो.कॉ. सागर भोसले, पो.कॉ. सुमित मोरे, पो.कॉ. अनिकेत अहिवळे, पो.कॉ. केतन जाधव, पो.कॉ. निलेश बच्छाव हे सदर कारवाईत सहभागी झाले होते.

No comments