फलटण रेमडिसिव्हीर इंजेक्शन काळाबाजार प्रकरणी तारळे येथील मानसी हॉस्पिटलच्या अरुण जाधव यांना अटक
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. ११ मे २०२१ - रेमडीसिव्हर इंजेक्शन 35 हजार रुपयांना विक्री करणाऱ्या टोळीस फलटण शहर पोलिसांनी जेरबंद केले. त्यांनतर पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करत, याप्रकरणी सातारा येथील कुलकर्णी व तारळे येथील लाहोटी यांना ताब्यात घेतले. त्या दोघांकडे चौकशी केली असता, त्यांना रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा तारळे तालुका पाटण येथील मानसी हॉस्पिटल येथील अरुण जाधव यांच्याकडून होत असल्याचे पुढे आले आहे, त्यानुसार अरुण जाधव यांना अटक करण्यात आली असून, त्याच्याकडे चौकशी चालू असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सांगितले.

उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे
रेमडिसिव्हीर इंजेक्शन काळा बाजारात विकली जात असल्याची माहिती फलटण पोलिसांना मिळाल्यानंतर, पोलिसांनी तातडीने सापळा रचून संबंधित सुविधा हॉस्पिटल फलटण येथील कंपाउंडरला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता, अजून तीन आरोपी निष्पन्न झाले. त्या सर्वांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांना सदर इंजेक्शनचा पुरवठा सातारा येथील कुलकर्णी आणि तारळे ता. पाटण येथील लाहोटी या इसमांकडून मिळत असल्याची माहिती प्राप्त झाली. त्या दोघांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत, मानसी हॉस्पीटल, तारळे ता.पाटण येथील अरुण जाधव यांच्याकडून, पुरवठा होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, त्यांनाही या प्रकरणी अटक करण्यात आले असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी सांगितले.
रेमडिसिव्हीर इंजेक्शन काळाबाजारच्या अनुषंगाने त्या इंजेक्शनच्या लॉट मधील बॅच नंबर, मॅच करून, नेमकं कुठून त्यांना रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा कुठून पुरवठा होत आहे. याबाबत तपास चालू आहे.
रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या काळाबाजार बाबत फलटण शहर पोलिसांनी अतिशय कौतुकास्पद कामगिरी केलेले आहे. त्यांचे अभिनंदन व नागरिकांना आवाहन की, रेमडिसिव्हीर इंजेक्शनच्या काळाबाजार बाबत आपणास कोणतीही माहिती असेल, तर तातडीने पोलीस स्टेशनला संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांनी केले आहे.

No comments