Breaking News

सातारा शहर व सातारा तालुक्यातील आठवडी बाजार बंद

Weekly markets closed in Satara city and Satara taluka

    सातारा  (जिमाका):- सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग बाधीत रुग्ण मोठया प्रमाणात आढळत असल्याने सातारा शहर व सातारा तालुक्यातील सर्व आठवडी बाजार पुढील आदेश हाईपर्यंत  बंद करण्यात आलेला आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी. तसेच याबाबत स्थानिक प्राधिकरण तसेच पोलीस विभाग यांनी योग्य ती कार्यवाही करावी. या आदेशाचे उल्लंघन केल्याचे निर्दशनास आल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदी नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन सातारा उपविभागीय अधिकारी मिनाज मुल्ला यांनी केले आहे.

No comments