Breaking News

जुगार अड्ड्यावर रेड ; 1 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त

Red at the gambling den; 1 lakh 70 thousand items confiscated

    फलटण  :- फलटण शहर पोलिसांनी जिंती नाका येथे ऑनलाईन चक्री जुगाराच्या अड्ड्यावर टाकलेल्या धाडीत एक लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी मनोज आत्माराम जाधव रा. जिंती नाका फलटण याच्यासह अन्य नऊ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

       याबाबत फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, गुरुवार दिनांक १ एप्रिल रोजी संध्याकाळी पावनेसहाच्या सुमारास जिंती नाका येथे एका बंद गाळ्यातील मनोज जाधव याच्या  ऑनलाईन चक्री जुगार अड्ड्यावर धाड टाकली. यावेळी जाधवसह तेथे असलेल्या ज्ञानेश्वर उत्तम राजगुरू, सुरज राजू जाधव दोघे रा. मलठण, सागर बाबुराव जाधव, अतुल शिवाजी जाधव, वसंत चव्हाण, संतोष वसंत जाधव सर्व रा. जिंती नाका, आकाश भाऊसाहेब सावंत रा. फलटण, वैभव संजय निंबाळकर रा. विंचुर्णी  ता. फलटण, रवींद्र बाळू चव्हाण रा. पलूस जिल्हा सांगली या नऊ जणांविरुध्द जुगार कायदा कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी

     टीव्ही, सीपीयू, की बोर्ड, माऊस, केबल, एक इंटरनेट डोंगल, एक लहान टेबल, एक मोठा टेबल, प्लास्टिक खुर्ची, चार प्लास्टिक स्टूल, दोन पाण्याचे जार,  दोन मोटारसायकली असा एक लाख ६९ हजार ७५० रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई अच्युत जगताप यांनी फिर्याद दिली असून तपास सपोनि गायकवाड करित आहेत. सदर कारवाईत पोलीस उपअधिक्षक तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक भारत किंद्रे, सपोनि सचिन राऊळ, पोलिस हवालदार मदने, पोलिस नाईक वाडकर, तांबे  पोलिस शिपाई जगताप, घाटगे, दडस यांचा सहभाग होता.

No comments