Breaking News

गुढी पाडवा सणानिमित्त सातारा जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश

Order of Satara District Magistrate on the occasion of Gudi Padwa

  सातारा दि. 12 (जिमाका) : गुढी पाडवा हा सण दि. 13 एप्रिल रोजी  साजरा करण्यात येणार आहे. सातारा जिह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार प्राप्त असलेल्या अधिकारा नुसार दि. 13 एप्रिल रोजीच्या 0.00 वा. पासुन ते दि. 13 एप्रिल रोजीच्या 24.00 वा. पर्यंत गुढी पाडवा सणानिमित्त पुढीलप्रमाणे आदेश जारी केले आहेत.

                गुढीपाडवा हा सण कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव टाळण्याच्यादृष्टीने  अत्यंत साधेपणाने सकाळी  7.00  वा.पासुन ते रात्री 8.00 वा. पर्यंत साजरा करावा. या निमित्त पालखी, दिंडी, प्रभात फेरी, बाईक रॅली व मीरवणूका काढण्यात येवू नयेत. त्याऐवजी आता सार्वजनिक ठिकाणी एकावेळी 5 पेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र न येता सोशल डिस्टन्सींगचे व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे (मास्क, सॅनिटायझर, इ. ) पालन करुन घरगुती गुढी उभारुन हा सण अत्यंत साधेपणाने साजरा करावा.  या सणाच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम, शिबिरे (उदा. रक्तदान) स्थानिक प्रशासनाच्या पुनर्वानुमतीने आयोजीत करता येतील आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि प्रतिबंधात्मक उपाय तसेच  स्वच्छता याबाबत जनजागृती करता येईल. तथापि, आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना कोविड-19 विषयक सर्व उपाययोजना करण्यात याव्यात, जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग, संक्रमण वाढणार नाही. कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत  व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित नगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहत केलेल्या नियमांचे काटेकोरपणे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या आदेशानंतर व प्रत्यक्ष गुढीपाडवा सण सुरु होण्याच्या मधल्याकालावधीत शासनस्तरावरुन व या कार्यालयाकडून तसेच स्थानिक प्रशासनाकडून काही नवीन सूचना प्रसिध्द झाल्यास त्याचे देखील अनुपालन करणे बंधनकार राहील.

                या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास त्यांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भातीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसर दंडनीय अथवा कादेशीर कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद केले आहे.

No comments