Breaking News

फलटण मध्ये सोशल डिस्टंसिंगचे पालन न केल्याने 4 दुकाने 7 दिवस बंद ; मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

फलटण शहरातील अरविंद क्लॉथ सेंटर येथे कारवाई करताना इन्सिडेंट कमांडर  शिवाजीराव जगताप, तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी प्रसाद काटकर

        4 shops closed for 7 days due to noncompliance of social distance in Phaltan

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 3 एप्रिल 2021-  शहरातील अरविंद क्लॉथ सेंटर, सम्राट इलेक्ट्रॉनिक्स, सुरभी टी सेंटर, भुसार किरणा होलसेल   दुकानांच्या वर सोशल डिस्टंसिंग चे पालन न केल्यामुळे कारवाई करत पुढील सात दिवसाकरीता  दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  तर विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडाची कारवाई करत 4 दुकानांसह एक बँक तसेच ०९ व्यक्ती यांच्याकडून रक्कम रुपये 7000 इतका दंड वसूल करण्यात आला आहे. दरम्यान जे नागरिक अथवा दुकानदार कोरोनासंदर्भातील प्रतिबंधक उपाय योजना, नियम पाळणार नाहीत, तसेच जे दुकानदार सोशल डिस्टंसिंग पाळणार नाहीत त्यांच्यावर यापुढे देखील कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा उपविभागीय  दंडाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर  शिवाजीराव जगताप यांनी दिला आहे.

    सातारा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, जिल्हाधिकाऱ्यांनी, प्रत्येक व्यक्तीने मास्क वापर वापरावे तसेच सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे, तसेच दुकानदार व्यापारी यांनीदेखील सोशल डिस्टंसिंगचे पालन करण्याचे आवाहन करून, कोरोना पार्श्वभूमीवर संचारबंदी सह नवीन  आदेश पारित केले होते, अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल असा इशारा देखील दिला होता. या पार्श्वभूमीवर आज फलटण शहरात कारवाई करण्यात आली.

     जिल्हाधिकारी सातारा यांच्या आदेशाप्रमाणे आज दिनांक 3 एप्रिल 2021 उपविभागीय  दंडाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर  शिवाजीराव जगताप यांचेसह तहसीलदार समीर यादव, मुख्याधिकारी प्रसाद काटकर  यांनी समक्ष सहभाग घेऊन महसूल विभाग व नगरपरिषद फलटण व पोलीस विभाग  यांच्यामार्फत संयुक्तिक कारवाई करत शहरात मास्क न वापरणाऱ्या व सोशल डिस्टंसिंग चे पालन न करणाऱ्या व्यापारी दुकानदार तसेच नागरिकांच्या वर कारवाई केली.

    या कारवाईमध्ये अरविंद क्लॉथ सेंटर, सम्राट इलेक्ट्रॉनिक्स ,सुरभी टी सेंटर,भुसार किरणा होलसेल दुकान या दुकानामध्ये  सोशल डिस्टंसिंग वापर न केल्यामुळे तसेच  गर्दी जमा  केल्यामुळे सदर 4 दुकाना करिता पुढील आदेशापर्यंत सात दिवसाकरीता बंद करण्यात आले आहे. तसेच विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे यामध्ये चार दुकाना सह एक बँक तसेच ०९ व्यक्ती यांच्याकडून रक्कम रुपये 7000 इतका दंड वसूल करण्यात आला.

No comments