Breaking News

काँग्रेसच्या फलटण तालुकाध्यक्ष पदी महेंद्र सूर्यवंशी (बेडके)

Mahendra Suryavanshi (Bedke) as Phaltan taluka president of Congress

गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या फलटण तालुका कार्यकारिणीच्या  पदाधिकारी निवडी नुकत्याच संपन्न झाल्या. फलटण तालुकाध्यक्षपदी महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांची निवड करण्यात आली  या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

        महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांनी सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्याबरोबरच काँग्रेस प्रणित आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेऊन सर्वसामान्यांचा आवाज सरकार दरबारी पोहचवून जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना काळात देखील गोरगरीब जनतेला अत्यावश्यक वस्तू, अन्नपदार्थ पुरवण्यात महेंद्र सूर्यवंशी कमी पडले नाहीत. याच कामाची दाखल घेऊन, त्यांच्यावर कोंग्रेस पक्षाने फलटण तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. 

       नियुक्ती प्रसंगी,   नूतन पदाधिकारी यांना  शुभेच्छा देऊन, आपण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा  श्रीमती सोनिया गांधी,  खासदार  श्री राहुल गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हात बळकट करून सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यात व त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची वाढ व विस्तार करणेत पुढाकार घ्यावा असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी केले.

No comments