Breaking News

लायनेस क्लब कडून 'सन्मान तेजस्विनीचा' या उपक्रमांतर्गत विविध क्षेत्रातील २५ महिलांचा सन्मान

Lions Club honors 25 women from various fields under 'Sanman Tejaswinicha' initiative
        फलटण : लायनेस क्लब ऑफ फलटण यांचेवतीने 'सन्मान तेजस्विनीचा' या उपक्रमांतर्गत वीरपत्नी वीरमाता कोव्हिड योद्धा, आदर्श व्यावसायिका आदर्श शिक्षिका आदर्श माता वगैरे क्षेत्रातील २५ महिलांचा सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त लायनेस क्लब फलटण यांचेवतीने सन्मान तेजस्विनीचा या उपक्रमातर्गत कोरोना कालावधीत वैद्यकिय क्षेत्रात काम करणाऱ्या महिला डॉ. संजीवनी राऊत, डॉ. सौदामिनी गांधी, डॉ. दिपा आगवणे, डॉ. कु गौतमी दोशी यांना गौरविण्यात आले.

        श्रीमती निलम निंबाळकर यांचा वीर पत्नी म्हणून, कमल ढेंबरे यांचा वीर माता म्हणून सत्कार करण्यात आला. मलठण श्रीमती फुलाबाई जगताप यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपले पतीच्या निधनानंतर आपला मुलगा लहान असताना शेती उद्योग व्यावसाय साभाळून संसार केला. त्यांचे चिरंजीव प्रमोद हे लायन्स क्लबचे अध्यक्ष आहेत.
सन्मान तेजस्विनीचा - वैद्यकिय क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करताना श्रीमंत सुभद्राराजे नाईक निबाळकर,   सौ. वसुंधराराजे नाईक  निंबाळकर,  भोजराज  नाईक निबाळकर, सौ. निलम लोंढे पाटील

    
    सौ. जनाबाई पिसाळ डॉ. पिसाळ यांची आई व नगरसेविका सौ. वैशाली चोरमले यांची आई यांनी गरीबीतून मुलीना शिक्षण दिले. सौ. प्रेमाबाई काकडे फलटण नगर परिषद येथे सफाई कामगार म्हणून काम करीत असताना तीन मुले सरकारी कर्मचारी सून शिक्षिका व मोठा मुलगा विकास काकडे मुधोजी हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत.

        शकुंतला भोईटे या फलटण येथील बॉम्बे फूट वेअर च्या मालकीण असून त्यांचा मोठा मुलगा व्यावसायीक एक डी. वाय.एस.पी व एक मल्टीनॅशनल कंपनीत मॅनेजर आहे. या सर्वाचा आदर्श माता पुरस्काराने सन्मान करण्यात आला. गुणवरे येथील सौ. सुलोचना चव्हाण यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या मुलांना प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण देवून उच्च शिक्षित केले. दोन मुले शासकिय सेवेत कार्यरत एक मुलगा महाराष्ट्र शासन एक्साईज व औषधे या ठिकाणी कार्यरत आहे. सौ. खाशीबाई गोवेकर यांचा एक मुलगा जिल्हाधिकारी एक जिल्हा पोलीस प्रमुख आहे. त्याचाही आदर्श माता म्हणून सत्कार करण्यात आला. गोखळी येथील शोभा राजेंद्र भागवत यांना आदर्श


        माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या मुलांना प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण देवून उच्चशिक्षित केले व करोना साथीच्या काळात आरोग्य कर्मचारी यांचेबरोबर घरोघरी जाऊन कुंटुंब सव्हेक्षण केले. सामाजीक क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्याबदल आदर्श माता पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. सौ. मंगल संतराम गावडे गुणवरे यांना आदर्श माता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपले मुलाना उच्चशिक्षण देवून ३ पोलीस उपनिरीक्षक एक शिक्षक असे शिक्षण देशून आदर्श निर्माण केला आहे.

        फलटण नगर पालिका बाधकाम समिती सभापती श्रीमंत सुभद्राराजे नाईक निबाळकर यांचे प्रमुख उपस्थितीत लायनेस क्लब फलटणच्या अध्यक्षा सौ. निलम लोंढे पाटील यांचे हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आले.

        यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी  सौ. वसुंधराराजे नाईक  निंबाळकर, सौ. स्नेहा व्होरा. सौ. सुनंदा भोसले. रिझन चेअरमन बाळासाहेब भोगळे, डिस्ट्रीक्ट चेअरमन ला. मंगेशशेठ दोशी गुणवरे कर , फलटण नगर पालिका सदस्या वैशाली चोरमले, भोजराज  नाईक निबाळकर, डॉ. अशोक व्होरा, मनुभाई पटेल रणजीत बर्गे,श्रीमती रुपाली बोरावके,

        पुष्पाताई कदम, फलटण पंचायत समितीच्या माजी सभापती लतिका अनपट, तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्षा राजश्री कदम, सविता दोशी, राजीव निंबाळकर, विजय लोंढे पाटील उपस्थित होते. सूत्रसंचलन सौ. हेमलता गुंजवटे यांनी केले.

No comments