कोरोनाचा धोका वाढला; फलटण तालुक्यात 63 रुग्ण; तरडगाव 32 तर शहरात 15
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 16 मार्च 2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 16 मार्च 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 63 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात 15 व्यक्ती तर ग्रामीण भागात 48 रुग्ण सापडले आहेत. तर तालुक्यात तरडगाव हा कोरोना चा हॉटस्पॉट ठरला आहे. या ठिकाणी एकाच आज वेळी 32 बाधित रुग्ण सापडले आहेत. दरम्यान फलटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, दुसऱ्या लाटेत आज प्रथमच 63 रुग्ण सापडले आहेत. यामुळे कोरोनाचा धोका वाढलेला आहे. नागरिकांनी कंपल्सरी मास्क वापरावे व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे.
फलटण शहरात 15 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये फलटण 6, मलठण 3, लक्ष्मीनगर 2, उमाजी नाईक चौक 1, गोळीबार मेदान 2, पोलीस कॉलनी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.
ग्रामीण भागात 48 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये तरडगाव 32, कोळकी 1, जाधववाडी 2, घाडगेवाडी 3, काळज 2, निंभोरे 1, गोखळी 1, आळजापूर 1, होळ 1, खडकी 1, सांगवी 2, पाडेगाव 1, व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
No comments