Breaking News

धोका वाढला! फलटण तालुक्यात 17 कोरोना पॉझिटिव्ह

Corona virus phaltan updates : 17 corona positive 

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 3 मार्च  2021 - जिल्हा प्रशासनाकडून आज 3 मार्च 2021 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 17 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  यामध्ये शहरात 9 व्यक्ती तर ग्रामीण भागात 8 रुग्ण सापडले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. दरम्यान फलटण तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, यामुळे कोरोनाचा धोका वाढलेला आहे. नागरिकांनी कंपल्सरी मास्क वापरावे  व सोशल डिस्टंसिंग चे पालन करावे तसेच शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे. 

फलटण शहरात 9 कोरोना पॉझिटिव्ह

 यामध्ये  फलटण 2,  गिरवी नाका 2, विवेकानंदनगर 2,  शिंगणापूर रोड फलटण 1, मलटण 2 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे. आहेत.

ग्रामीण भागात 8 कोरोना पॉझिटिव्ह 

 यामध्ये  वाठार निंबाळकर 1, आंदरूड 1, सुरवडी 1, मिरगाव 1, ढवळेवाडी 1,  पाडेगाव 1, तरडगाव 1, मलवडी 1 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

No comments