युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुसरन करुन वाटचाल करनेयाआवश्यक - ॲड. दीपक रुद्रभटे
![]() |
| छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करताना मान्यवर |
फलटण - छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्म संहिष्णुतेचे पालन करीत, जातीभेदाला थारा न देता स्वराज्याची स्थापना केली. आजच्या युवा पिढीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुसरन करुन वाटचाल करने आवश्यक आहे असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी वाचनालयाचे माजी सेक्रेटरी ॲड दीपक रुद्रभटे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवाजी वाचनालय येथे आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
छत्रपतींचा पराक्रम, संयम, आदर्श आणि कीर्ती जगभरात आहे. जगाने त्यांचा आदर्श स्वीकारला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रूपाने युगपुरुष अवतरला असून, गुलामगिरीची मानसिकता असताना त्यांनी कोणताही धर्म भेद व जाती भेद न करता जनतेला गुलामगिरी तुन मुक्त करीत जगाला मार्गदर्शक असा इतिहास रचला. समाजातील विविध घटकांना एकत्र करून संघर्षमय असा यशस्वी लढा दिला असे ॲड रुद्रभटे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष ॲड अजित शिंदे, विलासराव बोरावके (नाना) यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात प्रारंभी ॲड रुद्रभटे यांच्या हस्ते छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी ॲड अजित शिंदे, संचालक विलासराव नाना बोरावके, रवींद्र बर्गे, रवींद्र फौजदार, सुभाष भांबुरे महेश साळुंके, अंकुश गंगतिरे, सुनील पवार, मंगेश पवार आदींसह वाचक व परीसरातील नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक श्रीकृष्ण देशपांडे यांनी केले. आभार सुभाष भांबुरे यांनी मानले.

No comments