पर्यावरण बदलाला अनुरूप शेती होण्यासाठी केंद्राने धोरण आखावे; फळे, पिकांमध्ये अधिक संशोधन होणे गरजेचे - नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांची मागणी
The Center should formulate a policy to make agriculture conducive to climate change; Fruits, crops need more research - Demand of Chief Minister Uddhav Thackeray in the meeting of the Policy Commission
मुंबई - : पर्यावरण बदलामुळे आता आपल्याला देशाच्या शेती क्षेत्रात देखील अमूलाग्र बदल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ते आज नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत बोलत होते. ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आली होती.
पर्यावरण बदलामुळे केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशात इतरत्रही फटका बसत आहे हे सांगताना त्यांनी उत्तराखंड येथील नुकत्याच झालेल्या आपत्तीचे उदाहरण दिले. ते म्हणाले की, आपण विविध योजना शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवतो पण त्या बऱ्याच प्रमाणात आर्थिक लाभाच्या किंवा कर्जाशी संबंधित असतात. पर्यावरण बदलाच्या अनूषंगाने माध्यमांतून प्राधान्याने चर्चा होणे व त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे. आपल्याला बदलत्या वातावरणानुसार शेतीची पद्धतही बदलावी लागेल असे सांगून मुख्यमंत्र्यांनी राज्यात सुरु केलेल्या विकेल तेच पिकेल या अभियानाची माहिती दिली.
पीक पद्धतीत वैविध्य असणे गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की एकेकाळी सफरचंद म्हणजे काश्मीरची ओळख होती. जसे कोकणातच हापूस आंबा व्हायचा पण आता इतर देशांतूनही फळे येऊ लागली आहेत. आपण देखील फळांमध्ये आणि पिकांमध्ये त्यांचा दर्जा वाढविण्यासाठी काही मूलभूत बदल करू शकतो का ते पाहण्याची गरज आहे.
संशोधन केंद्रांना सहाय्य करावे
मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, राज्यात विविध संशोधन संस्था तसेच विद्यापीठे आहेत. यामध्ये चांगल्या दर्जाचे व गुणवत्तापूर्ण संशोधन व्हावे जेणेकरून उत्पादकता व दर्जा वाढून बाजारपेठ उपलब्ध होईल यादृष्टीने केंद्राने त्यांना आर्थिक व तांत्रिक सहाय्य करावे
बाजारपेठ निर्माण करावी
फळांवर विविध प्रक्रिया उद्योगांची उभारणी अधिक वेगाने व्हायला हवी तसेच उत्पादित मालाला बाजारपेठा उपलब्ध होण्यासाठी प्रत्यक्ष काही प्रयत्न होणे गरजेचे आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी बाजारपेठ संशोधन खूप मत्त्वाचे आहे असे सांगितले.
No comments