Breaking News

दिल्ली शेतकरी आंदोलनास पाठिंबा देत वीज बिल माफ करण्यासाठी स्वाभिमानीचे रास्तारोको

सोमंथळी येथे फलटण बारामती महामार्गावर ठिय्या आंदोलन करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी

Swabhimani's Rastaroko for  support of Delhi Farmers Movement and to waive electricity bill

गंधवार्ता वृत्तसेवा, सोमंथळी दि. 6 फेब्रुवारी 2021- :  अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या वतीने  देशव्यापी चक्का जाम आंदोलन करण्यात आले  यामध्ये प्रामुख्याने तीन कृषी कायदे रद्द करण्यात यावे यासाठी दिल्ली येथे थंडीची पर्वा न करता  शेतकरी आंदोलन करत आहेत. याच्या समर्थनार्थ महाराष्ट्रातही  शेतकऱ्यांच्या वतीने  स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रास्ता रोको आंदोलन केले. फलटण तालुक्यात देखील सोमंथळी येथे रास्ता आज सकाळी ११ वाजता  रास्ता रोको आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांचे नेतृत्वाखाली  शेतकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

आंदोलनामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात अशा घोषणा देत, शेतकऱ्यांचे कृषी वीज बिल  माफ व्हावे व सर्वसामान्यांचे घरगुती वीज बिल माफ करावे, या मागण्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फलटण बारामती मार्ग रोखला. यावेळी स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष नितीन यादव, सचिन खानविलकर,दादा जाधव ,प्रमोद गाडे, अक्षय चव्हाण, बाळासाहेब शिपकुले हिटलर अलगुडे, नाना अहिवळे ,अक्षय लोंढे,रोहन मोहिते, रोहन चव्हाणसह शेतकरी महिला सहभागी झाल्या होत्या. 

No comments