Breaking News

बेरोजगार उमेदवारांसाठी 15, 16 व 17 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

Organizing online job fairs for unemployed candidates on 15th, 16th and 17th February

        सातारा दि. 13: जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा व रयत शिक्षण संस्थेचे यशवंतराव चव्हाण इन्सटीट्युट ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने 15, 16 व 17 फेब्रुवारी 2021 रोजी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे  आयोजन करण्यात आले आहे. याचा जास्तीत जास्त बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सचिव जाधव यांनी केले.

  या ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02162-239938 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा satararojgar1@gmail.com या ईमेलवर आयडीवर संपर्क साधावा असेही आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

No comments