महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि खादी व ग्रामोद्योग आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या
सातारा दि. 18 (जिमाका): महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि खादी व ग्रामोद्योग आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते सायं. 5.30 या वेळेत चर्चासत्र व मध उद्योग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेचे उद्घाटन प्रधान सचिव तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, मुंबई डॉ. नीलिमा केरकेट्टा यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी राज्य निर्देशक खादी व ग्रामोद्योग आयोग मनीष कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (मध) बिपीन जगताप, सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी खादी व ग्रामोद्योग आयोग मुंबई एम.टी. वाकोडे, टेरे पॉलिशी सेंटर, माजी संचालक यु.एन.ई.पॅरिस चेअरमन डॉ. राजेंद्र शेंडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
No comments