19 फेब्रुवारी रोजी मद्यविक्री दुकाने बंद
सातारा,दि. 18 -: मुंबई मद्य निषेध कायदा 1949 मधील कलम 142 (1) मधील तरतुदीनुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शिवजयंती निमित्त 19 फेब्रुवारी रोजी सातारा शहरातील मिरवणुक मार्गावरील सर्व देशी दारु, किरकोळ विक्री (सीएल.3), बिअर विक्री (एफएल/बीआर-2), विदेशी मद्य किरकोळ विक्री (एफएल.2), परवाना कक्ष अनुज्ञप्ती (एफएल.3), बिअरबार (फॉर्म-ई), ताडीविक्री (टि.डी.1) या अनुज्ञप्तींची जागा व विक्री पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
कोणत्याही अनुज्ञप्तीधारकाकडून या आदेशाचे उल्लंघन झाल्यास त्याच्याविरुद्ध कायद्यानुसार योग्य ती कडक कारवाई केली जाईल तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास कर्तव्यावर उपस्थित असलेले पोलीस अधिकारी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 मधील कलम 142 (2) अन्वये कोणतीही मद्य, ताडी विक्री अनुज्ञप्ती बंद करु शकतात, असेही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आदेशात नमुद केले आहे.
No comments