Breaking News

हिरामण किसनराव जाधव यांचे निधन

Hiraman Kisanrao Jadhav passed away

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - दैनिक गंधवार्ताचे कार्यकारी संपादक ॲड. रोहित अहिवळे यांचे सासरे व  सहसंपादिका सौ. सुरुची रोहित अहिवळे यांचे पिताश्री हिरामण किसन जाधव यांचे दि. 7 फेब्रुवारी 2021 रोजी आकस्मित निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगी, जावई,  दोन मुले, सुना, नातवंडे  असा परिवार आहे. 

          नाशिकरोड येथील रहिवासी असणारे हिरामण जाधव हे रेल्वे खात्यात नोकरीस होते.  त्यांचा स्वभाव हसतमुख व मनमिळावू असल्यामुळे त्यांचा मित्रपरिवार मोठा होता.   हिरामण जाधव यांचे वडील किसनराव अर्जुनराव जाधव हे जलसाकार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या काळाराम सत्याग्रहात त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता.  हिरामण जाधव यांनी देखील लहानपणी आपल्या वडिलांबरोबर जलसा व डॉ. बाबासाहेबांच्या सभांमध्ये हजेरी लावली आहे.  अशी पार्श्वभूमी असणाऱ्या हिरामण जाधव यांचा देखील आंबेडकरी चळवळीत सक्रिय सहभाग होता. 

         दिनांक 14 फेब्रुवारी 2021 रोजी नाशिक रोड येथे, त्यांचा जलदान व दहाव्याचा विधी संपन्न होणार आहे. 

No comments