शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक – विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
Government is positive about various demands of teachers - Dr. Neelam Gorhe
मुंबई - : शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचे प्रतिपादन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.
उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी आझाद मैदान येथे विविध मागण्यासंदर्भात आंदोलन करीत असलेल्या शिक्षक-कर्मचारी संघाशी संवाद साधला. यावेळी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, आमदार भाई गिरकर, आमदार अभिमन्यू पवार, डॉ.रणजित पाटील, रामराव पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.
उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, शिक्षकांच्या विविध मागण्यांसदर्भात शासन सातत्याने सकारात्मक पावले उचलत असून शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांसंदर्भात लवकरच योग्य कार्यवाही करण्यात येईल, असेही डॉ.गोऱ्हे यांनी सांगितले.

No comments