सातारा जिल्ह्यात 70 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; 2 बाधितांचा मृत्यु
Corona virus Satara District updates : 70 corona positive
सातारा दि. 20 (जिमाका): जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 70 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 7, संगमनगर 2, शहूपुरी 1, सैदापूर 1, कोडोली 1, वेळे 1, गोवे 1, देगाव 1, सातारा रोड 1, मोळाचा ओढा 1,
कराड तालुक्यातील मलकापूर 2, फडतरवाडी 1, पाडळी 3, गायकवाडवाडी 1,
पाटण तालुक्यातील शेंडेवाडी 1,
वाई तालुक्यातील आझर्डे 1, कवठे 2, माठेकरवाडी 1, ,
फलटण तालुक्यातील गुणवरे 1,
खटाव तालुक्यातील नांदोशी 1, डंभेवाडी 1, जायगाव 1, पुसेगाव 1, कातरखटाव 2, मांडवे 2,
माण तालुक्यातील दहिवडी 3, बिदाल 1,
कोरेगाव तालुक्यातील तारगाव 2, रुई 1, एकसळ 1, सासुर्वे 3,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, लोणंद 1, अहिरे 2, सुखेड 1, शिरवळ 2,
महाबळेश्वर तालुक्यातील भिलार 4, महाबळेश्वर 1, पाचगणी 1,
जावली तालुक्यातील जावळी 1, करहर 1, पिंपळी 1, कारंडी 4,
इतर 1
दोन बाधितांचा मृत्यू
जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये इस्लामपूर, ता. वाळवा येथील 81 वर्षीय व खंडाळा येथील 57 वर्षीय महिला या दोन कोविड बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
एकूण नमुने -335874
एकूण बाधित -57881
घरी सोडण्यात आलेले -55049
मृत्यू -1847
उपचारार्थ रुग्ण-985

No comments