अभिनेते राजीव कपूर यांचे निधन
Actor Rajiv Kapoor passes away
राज कपूर यांचा पुत्र व ऋषी कपूर आणि रणधीर कपूर यांचे छोटे भाऊ अभिनेते राजीव कपूर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ते ५८ वर्षांचे होते. चेंबूर येथील रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
रणधीर कपूर यांनी राजीव यांचं निधन झाल्याचं सांगितलं. भावाच्या निधनाबद्दल रणधीर म्हणाले की, 'आज मी माझ्या छोट्या भावाला राजीवला गमावलं. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे प्रयत्न केले. पण त्याचे प्राण वाचवू शकले नाही. नितू कपूर यांनी राजीव कपूर यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याच्या जाण्याचं दुःख व्यक्त केलं.
कपूर कुटुंबासाठी हा खूप मोठा धक्का आहे. गेल्यावर्षी ऋषी कपूर यांचे कॅन्सरमुळे निधन झाले होते.
No comments