Breaking News

सातारा जिल्ह्यात 136 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 479 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

136 corona patients discharged today in Satara district

    सातारा दि.26 (जिमाका):जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 136 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 479 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

479 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

    जिल्हा  रुग्णालय सातारा येथील 40, कराड येथील 62, फलटण येथील 35, कोरेगाव येथील 26, वाई येथील 53, खंडाळा येथील 11, रायगाव येथील 24 , पानमळेवाडी येथील 113, महाबळेश्वर येथील 15, दहिवडी येथील 22, म्हसवड येथील 28, व कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 50 असे एकुण 479 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

एकूण नमुने -344134

एकूण बाधित -58504  

घरी सोडण्यात आलेले -55600  

मृत्यू -1851 

उपचारार्थ रुग्ण- 1053 

No comments