फलटण येथे तलवार व कुऱ्हाडीने वार : 4 गंभीर जखमी
फलटण दि. 20 जानेवारी (गंधवार्ता वृत्तसेवा) - दुचाकी वाहनांची एकमेकाला धडक झाल्याच्या कारणावरून तसेच पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून, भीमनगर रविवार पेठ फलटण येथील चौघांनी येथीलच महिलेसह तिच्या 2 मुलांना व जावई यांना तलवार, कुऱ्हाड, लोखंडी रॉड च्या सहाय्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांच्या दुचाकी वाहनाचे नुकसान केले.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 19 जानेवारी 2021 रोजी 12:30 वाजण्याच्या सुमारास, भीमनागर, रविवार पेठ, फलटण येथे, फिर्यादी चंद्रकांत भोसले यांच्या घरासमोर, फिर्यादी यांचे दाजी नितीन अहिवळे व आरोपी रोहित विलास अहिवळे यांची एकमेकांच्या दुचाकी वाहनांची धडक झाली, या कारणावरून तसेच दोन वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मानत धरून, रोहित विलास अहिवळे व इतरांनी फिर्यादी यांचे दाजी नितीन अहिवळे यांच्या ऍक्टिवा दुचाकी वाहनाची दगडाने तोडफोड केली. त्यावेळी फिर्यादी चंद्रकांत भोसले व इतर घराबाहेर येऊन, झाल्या प्रकाराचा जाब विचारला असता, भीमा विलास अहिवळे, रोहित विलास अहिवळे, विलास नामदेव अहिवळे, दत्ता दिलीप खलाटे सर्व राहणार सरकारी दवाखान्याच्या पाठीमागे भीम नगर रविवार पेठ फलटण यांनी आपापसात संगनमत करून फिर्यादी चंद्रकांत भोसले व त्यांचा भाऊ सूर्यकांत भोसले, दाजी नितीन अहिवळे व फिर्यादीची आई सौ. शर्मीला भोसले यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवार, दोन कुऱ्हाडी, लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केले, असल्याची फिर्याद चंद्रकांत भोसले यांनी दिली आहे.
गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपविभागीय अधिकारी तानाजी बरडे हे करीत आहे.


No comments