राजधानी किल्ले अजिंक्यताऱयावर स्वाभिमान दिन उत्सव शाही पद्धतीने साजरा
सातारा - झेंडूच्या फुलांनी सजवलेला किल्ले अजिंक्यतारा, राजसदरेवर काढलेल्या रांगोळय़ा, सनईचा मंजूळ स्वर, तुताऱयांचा निनाद, अशा शिवमय वातावरणात किल्ले अजिंक्याताऱयावर छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू छत्रपती शाहु महाराज यांचा स्वराज्यभिषेक व सातारा शहराचा स्थापना दिन तथा स्वाभिमान दिन शाही पद्धतीने उत्साहात पार पडला. जगात प्रथमच किल्ले अजिंक्यताऱयावर नगरपालिकेची विशेष सभा पार पडली. या सभेत अजिंक्यताऱयांच्या विकासाचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला. छत्रपती शाहु महाराजांच्या समाधींचा जीर्णोद्धार करणारे अजय जाधवराव, राजुशेठ राजपुरे यांचा सातारा भुषण पुरस्कार देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
किल्ले अजिंक्यताऱयावर 300 वा स्वाभिमान दिन व शिवराज्यभिषेक उत्सव समितीच्यावतीने 11 व्या वर्षी स्वाभिमान दिन उत्साहात शाही पद्धतीने साजरा करण्यात आला. या उत्सवासाठी नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, बांधकाम सभापती सिद्धी पवार, पाणी पुरवठा सभापती सीता हादगे, महिला व बालकल्याण सभापती रजनी जेधे, नियोजन सभापती स्नेहा नलावडे, सुजाता राजेशिर्के, स्मिता घोडके, किशोर शिंदे, श्रीकांत आंबेकर, ऍड. दत्ता बनकर, शेखर मोरे-पाटील, निशांत पाटील, बाळासाहेब ढेकणे, मुख्याधिकारी अभिजीत बापट, बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे, शिवराज्यभिषेक उत्सव समितीचे मार्गदर्शक दीपक प्रभावळकर, संस्थापक अध्यक्ष सुदामदादा गायकवाड, कन्हैय्यालाल राजपुरोहित, सामाजिक कार्यकर्ते रवी पवार, शिवसेनेचे सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, मनसेचे सातारा शहरप्रमुख राहुल पवार, भाजपाच्या दीपा झाड, दीपक भुजबळ, शिवभक्त अभि सुर्वे, मंगेश काशिद, सातारा सायकल ग्रुपचे सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.
किल्ले राजधानी अजिंक्यताऱयाचे प्रवेशद्वार स्वाभिमान दिनानिमित्ताने सजवण्यात आले होते. स्वाभिमान दिनानिमित्ताने येणारे शिवभक्तांचे स्वागत गडावर सनईच्या मंजूळ अशा स्वरांनी केले जात होते. गडाला माथा टेकून शिवभक्त गडावर उत्सवाच्या ठिकाणी पोहचत होते. कार्यक्रमाची उंची संदीप मंहिद गुरुजी, दीपक प्रभावळकर यांच्या शब्दांनी वाढत होती. इतिहासकार अजय जाधवराव यांनी छत्रपत शाहू महाराज आणि अजिंक्यतारा व शाहू महाराजांची समाधीबाबत माहिती सांगून स्फुरण चेतवले. राजू शेठ यांनी राजपुरोहित यांनी कार्याची महती सांगितली असा उत्सव उंचीवर नेताना इतिहासात प्रथमच सातारा पालिकेची विशेष सभा गडावर पार पडली. त्या सभेत किल्ले अजिंक्यताऱयाच्या सुशोभिकरणाचा विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आला.
बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने 1 लाख रुपयांची मदत
किल्ले अजिंक्यताऱयाला उर्जिंत अवस्था आणण्यासाठी पालिकेने घेतलेल्या ठरावानंतर बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे येंनी 1 लाख रुपये देण्याची घोषणा केली. ते म्हणाले, 11 वा हा स्वाभिमान दिन साजरा होत असून इतिहासातल्या स्वाभिमान दिवसाला 300 वर्ष झालीं आहेत. मात्र, आजचा दिवस हा इतिहासात पूर्ण भारतात लिहला जाईल. बनकर साहेबानी जो महत्वाचे विषय मांडला अजिंक्यताऱयाच्या संर्वर्धनाचा तो खूप महत्वाचा आहे. किल्ले अजिंक्यताऱयाच्या संवर्धनासाठी 1 लाख रुपयांचा निधी जाहीर करतो. सर्व तोपरी सहकार्य बालाजी चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
सातारा भुषण पुरस्काराने अजय जाधवराव, राजु शेठ राजपूरे यांचा सन्मान
सातारा शहर वसवणाऱया छत्रपती शाहु महाराजांच्या समाधीचा जीर्णोध्दार करणारे अजय जाधवराव, राजू शेठ राजपूरे यांचा सन्मान तलवार देवून राजेंद्र चोरगे, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, ऍड. दत्ता बनकर, मुख्याधिकारी अभिजीत बापट यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. शंकरराव पुंभार, शरद पवार यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
No comments